Join us

Positive Energy Plants : ही पाच झाडे लावा घरातील वातावरण राहील प्रसन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:06 AM

सुंदर झाडेदेखील घरातील सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतात आणि घरातील नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतात.

सुंदर झाडेदेखील घरातील सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतात आणि घरातील नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतात. झाडांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व आपल्याला माहीतच आहे. 

अनेक लोकांना गार्डनिंग करण्याची आवड असते. मात्र, घरात कोणती झाड लावायला हवी हे कळत नाही. मग, घरात अशी झाडं लावा जी वास्तूच्या दृष्टीने शुभ मानले जातात.

वास्तू नियमांनुसार, सुंदर झाडेदेखील घरातील सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतात आणि घरातील नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतात.

घरातील वातावरण प्रसन्न झाल्यास तुमचे मन प्रसन्न राहते. त्यामुळे तुमचे कामामध्ये लक्ष लागते. कोणते झाडे लावायचे प्रश्न पडला असेल तर चला जाणून घेऊया.

१) मनी प्लांटघरातील संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून मनी प्लांट सर्वात लोकप्रिय आहे. ही वनस्पती जितक्या वेगाने वाढेल तितक्या वेगाने घरात पैसा येतो. घरामध्ये मनी प्लांट लावताना हे लक्षात ठेवा की ते आग्नेय दिशेला लावावे. मनी प्लांटचे रोप जमिनीवर ठेवू नका.

२) डाळिंबडाळिंब हे केवळ चव आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे, असे नाही तर त्यार्च रोप माणसाला आर्थिक आघाडीवर समृद्ध बनवते. घरासमोर डाळिंबाचे रोप लावल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. लागवड करताना घराच्या आग्नेय किंवा नैऋत्य दिशेला लावू नये.

३) बांबूघरासमोर बांबूचे रोप असणे देखील खूप शुभ मानले जाते. वास्तुनुसार ईशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवल्यास घरात पैशांचा पाऊस पडू लागतो. घरासमोर बांबूचे रोप कधीच गरीब होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे घरातील वातावरण ताजे राहते.

४) बेलबेलाचे झाडदेखील शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, बेलाचे पान भगवान भोलेशंकर वास्तव्य करतात आणि ज्या घराच्या दारावर स्वतः भगवान शंकराची नजर असते त्या घरात दारिद्रय नसते असे मानतात. वैज्ञानिकदृष्ट्या बेलाच्या झाडाला खूप महत्त्व असते.

५) क्रॅसुलाक्रॅसुलाचे झाड लावू शकता. हे झाड घरात ठेवल्यास तुमच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकट येत नाहीत, अशी आख्यायिका आहे. हे झाडं छोटे असल्याने तुम्ही हे छोटे कुठेही ठेवू शकता.

तुम्हाला फ्रेश वाटू लागेल घरात हिरवाई असली की, आपोआपच सकारात्मकता येते असे म्हटले जाते. घरात झाडे लावल्यानंतर प्राणवायू मिळतो. घरातील वातावरण प्रसन्न राहते. झाडाला पाहून तुम्हाला फ्रेश वाटू लागेल.

रेणुका शेजूळवनस्पती अभ्यासक

टॅग्स :इनडोअर प्लाण्ट्सपर्यावरणसुंदर गृहनियोजनलागवड, मशागतपैसाडाळिंब