वैजापूर : नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाकडून वैजापूर, गंगापूर, कोपरगाव या तीन तालुक्यांतील नांदूर मधमेश्वर जलद कालव्यात लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम सिंचनासाठी पाणी आवर्तन ३० नोव्हेंबरपर्यंत सोडण्यासाठी शक्यता वर्तविली जात आहे.
या वर्षात पावसाने पाठ फिरविल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून जलद कालव्यात पाणी आवर्तन सोडण्याची मागणी वाढल्याने पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे. या पाणी आवर्तनामुळे वैजापूर, होईल. गंगापूर व कोपरगाव या तीन तालुक्यांतील रब्बी हंगामामधील गहू, हरभरा आदी भुसार पिकांना संजीवनी मिळेल; तसेच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे निर्माण झालेले संकट दूर होईल.
नांमका कालव्यावरील एकूण २६ वितरिका व दोन शाखा कालवा यामधील लाभधारक शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पायथा ते माथा या नियमानुसार कालव्याद्वारे पाणी आवर्तन कार्यक्रम सुरळीत देण्याची तयारी करण्यात आली आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाकडे पाणी मागणीचे अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले
११० गावे अवलंबूनवैजापूर व गंगापूर या दोन टंचाईग्रस्त तालुक्यातील जवळपास ११० गावांतील सिंचन व पिण्याच्या पाण्याची भिस्त नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातील पाणी आवर्तनावर अधिक अवलंबून आहे.- राकेश गुजरे, कार्यकारी अभियंता, 'नामका पाटबंधारे विभाग, वैजापूर