भारतीय डाक विभागामार्फत मागील तीन वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या अपघाती विमा सुरक्षा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. टपाल खात्याने बजाज व टाटा एआयजीसोबत करार करून देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अपघात संरक्षण विमा योजना आणली आहे. अवघ्या ३९६ व ३९९ रुपयांत दोन वेगवेगळ्या विमा पॉलिसी प्लॅन या योजनेत उपलब्ध आहेत.
भारतीय टपाल विभागाने कमी वार्षिक हप्त्यावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी विमा सुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेला सुरू होऊन तीन वर्षे झाली आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ३० ते ४० हजार पॉलिसीधारक आहेत. विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा नाशिक मुख्य टपाल कार्यालयाकडून करण्यात आला आहे. विमा पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी केवळ पोस्टाच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडणे बंधनकारक आहे. यामध्ये लाभार्थीला वर्षाकाठी १० लाख रुपयांचा अपघात विमा फक्त ३९६ आणि ३९९ रुपयांच्या प्रीमियमसह काढता येतो.
३९६ रुपयांत:
३९६ रुपयांत टपाल खात्यातून बजाजसोबत करार असलेला विमा पॉलिसी प्लॅन घेता येते. यामध्ये दहा लाखांचा अपघाती सुरक्षा कवच मिळतो. अपंगत्व किंवा अंशत: अपंगत्व आले तर दहा लाखांचे अर्थसाहाय्य दिले जाते. रुग्णालयात दाखल झाल्यास ६० हजारांपर्यंत दवाखाना खर्च कॅशलेस होतो. अॅडमिट न होता उपचार घेतल्यास ३० हजारांपर्यंतच्या खर्चाची रक्कम मिळते. दुर्देवी मृत्यू झाल्यास वारसाला दहा लाख रुपयांची मदत दिली जाते. कुटुंबातील एका मुलाच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.
३९९ रुपयांत :
हा विमा पॉलिसी प्लॅन टाटासोबत टायप करण्यात आला आहे. यामध्ये कॅशलेसची सुविधा मिळत नाही. दिला जातो. अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास दहा लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते.
विमा कसा काढाल?
१. कुठल्याही जवळच्या टपाल कार्यालयात किंवा उपकार्यालयात जाऊन पोस्टमनकडून अथवा काउंटरवर भेट देत आयपीपीबी बँकेचे खाते उघडून घ्यावे.
२. बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. ऑनलाइन विमा पॉलिसी काढल्यानंतर ई-मेलवर पॉलिसी कागदपत्रे प्राप्त
या वर्षात सातजणांना मिळाले ७० लाख
चालू वर्षात सात पॉलिसीधारकांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या वारसदारांकडून दावा दाखल केला. मागीलवर्षी चार पॉलिसीधारकांचा तसेच दवाखाना खर्चसुद्धा मृत्यू झाला होता. त्यांना प्रत्येकी दहा बिल सबमिट केल्यानंतर लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आल्याची माहिती टपाल मास्तर रामसिंग परदेशी यांनी दिली. लहान- मोठ्या अपघातात जखमी झाल्याचे एकूण ३०० यावर्षी, तर गेल्यावर्षी २०० दावे प्राप्त झाले होते.
नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून या विमा संरक्षण पॉलिसीला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३९६ रुपयांत उपलब्ध असलेल्या पॉलिसी प्लॅन घेणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. ही पॉलिसी केवळ टपाल कार्यालयातून काढता येते. यासाठी वर्षाकाठी केवळ ३९६ रुपयांचा प्रिमियम भरावा लागतो.
-रामसिंग परदेशी, टपालमास्तर, मुख्य डाकघर, नाशिक