Join us

Potato Farming : यंदा टाकळी राजेरायमध्ये ४०० एकर क्षेत्रावर बटाट्याची लागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:18 IST

Potato Farming पारंपरिक व नकदी पिकांना बाजारात मिळणारा कमी भाव, तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेली उत्पादनात घट यामुळे शेतकरी नवीन पिकांच्या लागवडीचे सातत्याने प्रयोग करतात. यंदा टाकळी राजेरायमध्ये ४०० एकर क्षेत्रावर बटाट्याची लागवड केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : पारंपरिक व नकदी पिकांना बाजारात market मिळणारा कमी भाव, तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेली उत्पादनात घट यामुळे शेतकरी नवीन पिकांच्या लागवडीचे सातत्याने प्रयोग करतात.

असाच प्रयोग यंदा खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय या गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी केला आहे. चांगला दर तसेच भरघोष उत्पन्न Income मिळत असल्याने या गावात सुमारे चारशे एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी बटाट्यांची लागवडPotato Cultivation केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने बटाटा लागवड झालेले जिल्ह्यातील हे पहिले गाव आहे.

टाकळी राजेराय हे खुलताबाद तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे. या गावात पूर्वीपासून शेतकरी पारंपरिक traditionalपद्धतीने कपाशी, मका, सोयाबीन आदी पिके घेत होते. मात्र, या पिकांना सध्या बाजारात मिळणारा कमी भाव तसेच निसर्गाच्या लहरीपणाने विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे होणारे नुकसान. त्याचा परिणाम म्हणून येथील शेतकऱ्यांनी तीन वर्षांपासून बटाटाशेती करण्याचा चंग बांधला.

बटाट्याला कमी पाणी लागते, तसेच उत्पादन चांगले येते. सध्या बाजारात चांगला भाव आहे. यामुळे बटाट्याच्या शेतीला पसंती दिली गेली. चांगल्या उत्पादनामुळे गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी सुमारे चारशे एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केली आहे. या गावात बागायती जमीन चारशे हेक्टर आहे, त्यात १६२ हेक्टरवर बटाटा लागवड झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर येथून बेणे आणले आहे. सध्या काही शेतकऱ्यांचे उत्पादन बाजारात यायला सुरुवात झाली आहे.

बटाटा लागवडीचा एकरी खर्च

* बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांना एकरी १० क्विंटल बटाटा बेणे लागते. शेतकऱ्यांनी हे बेणे साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलने पुणे जिल्ह्यातील मंचरहून विकत आणले आहे.

* लागवड, मजुरी, खते, ३ रासायनिक औषधी आदी मिळून एकरी या पिकाला सुमारे ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो.

बटाट्याच्या लागवडीचा खर्च जास्त असला, तरी उत्पादन आणि बाजारभाव चांगला मिळाल्यास नफा मिळण्याची खात्री आहे. यंदा ४०० एकर क्षेत्रात गावात बटाटा लागवड झाली आहे. - इकबाल पटेल, शेतकरी, टाकळी राजेराय

पुणे जिल्ह्यातील मंचर येथून बेणे आणले आहे. सर्वांनी मिळून गाडी केल्याने आम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडले. सध्या बटाट्याची शेती बहरलेली असून चांगला भाव मिळाला तर हे पीक आम्हाला फायद्यात पडणार आहे. - इमरान अमीन पटेल, शेतकरी

अडीच महिन्यांत मिळते उत्पादन

बटाट्याचे उत्पादन अडीच महिन्यांत निघते. एकरी १० ते १०० क्विंटल उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. यामुळे टाकळीच्या शेतकऱ्यांसाठी हे पीक फायदेशीर ठरत आहे. - मोहसीन पटेल, शेतकरी

टॅग्स :शेती क्षेत्रबटाटाभाज्याशेतीशेतकरीलागवड, मशागतऔरंगाबाद