Join us

शेततळ्याच्या माध्यमातून पिकांना सिंचनाचे बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 4:58 PM

कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना तालुक्यात राबवली जात आहे. महाडीबीटी या संकेतस्थळावर शेततळे घटकासाठी अर्जप्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.

रेवणअप्पा साळेगावकर

सेलू तालुक्यात सिंचनाच्या सोयी अपुऱ्या असल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाच्या शाश्वत कृषी सिंचन शेततळे या योजनेतून शेततळे खोदण्यासाठी शेतकरी पुढे येत असून यातून तालुक्यातील सिंचनाला बळ मिळणार आहे. पावसाचा खंड पडल्यास शेततळ्यातील पाण्याचा पिकाला आधार मिळणार आहे.

दरम्यान, मार्च अखेरपर्यंत शंभर शेततळे खोदण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निम्न दुधनासारखा प्रकल्प असला तरी तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीला या प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. विशेष करून देऊळगाव गात, रवळगाव सर्कलमधील जवळपास १६ गावांतील शेत शिवारात एकही प्रकल्प नाही. या भागातून कसुरा नदी वाहते. परंतु, नदीचे पात्र ठिकठिकाणी अरुंद झाले असून पावसाळ्यात वाहणारे पाणी अडवण्यासाठी एकही मोठा बंधारा नदीवर बांधण्यात आला नाही.

परिणामी पावसाळ्यात येणारे पाणी वाहून जाते. परिणामी या परिसरातील शेतीला शाश्वत पाणी मिळत नाही. मात्र, कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना तालुक्यात राबवली जात आहे. महाडीबीटी या संकेतस्थळावर शेततळे घटकासाठी अर्जप्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊसाच्या उत्पादनाचा ब्रॅंड  

योजनेत आठ प्रकारचे शेततळी

शेततळी आठ प्रकारची आहेत. यात सर्वात लहान शेततळे १५ x १५ x ०३ मीटर खोलीचे तसेच सर्वात मोठे शेततळे ३४ x ३४ x ३ मीटरपर्यंत आकारमानाचे शेतकऱ्यांना घेता येणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त ७५ हजार रुपये एवढे शासनाकडून अनुदान दिले जाते. शेततळे अस्तरीकरणासाठी ७५ हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते.

२० शेततळ्यांची कामे पूर्णी

• तालुक्यात सद्यस्थितीत २० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून मार्च अखेरपर्यंत ५० शेततळ्यांचे काम पूर्ण होणार आहे.

• शेतकऱ्यांसाठी शेततळी फायदेशीर ठरत आहेत. दरम्यान, शासनाकडून शेततळे खोदण्यासाठी अनुदान मिळत असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तर पिकाला मिळणार जीवदान

खरीप हंगामातील सोयाबीन किंवा इतर

• पिकासाठी एक किंवा दोन संरक्षित पाणी देण्यासाठी शेततळ्यातील पाण्याचा उपयोग होतो,

• पावसाळ्यात पावसाचा खंड पडला तर २ पिके कोमेजतात, पीक हातचे जाते. तेव्हा शेततळ्यातील एका संरक्षित पाण्यामुळे पिकाला जीवदान मिळू शकते. तुषार संचाने पाणी दिल्यास शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फायदा होणार आहे.

अनेक शेतकरी हे फळबाग लागवड करतात. त्यासाठी शेततळ्यातील पाण्याचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गावागावात शेततळे योजनेची माहिती दिली जात आहे. - एस.टी. पठाण, तालुका कृषी अधिकारी

 

टॅग्स :पाणीशेतीपाणी टंचाईपाणीकपातशेतकरी