Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PMKMY) ही एक शेतकऱ्यांना फायदेशीर योजना आहे. या योजनेचा उद्देश लहान तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. १२ सप्टेंबर २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली, ही ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना १८ ते ४० वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PMKMY) ही लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर ३ हजार रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्यांना ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या वयानुसार बदलते.
योजनेची पात्रता :
वय मर्यादा : १८ ते ४० वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
जमीन मर्यादा : अर्जदाराकडे २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असावी. अर्जदार इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा.
अर्ज प्रक्रिया : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट द्या. तुम्हाला या योजनेसाठी CSC केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा मिळते.
केंद्रांबद्दल माहितीसाठी, तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीची कागदपत्रे, मोबाईल नंबर
योजनेत नोंदणी करा : तुमच्या कागदपत्रांमधील माहितीच्या आधारे CSC ऑपरेटर तुमची ऑनलाइन नोंदणी करेल. यामध्ये तुमची बँकिंग माहिती आणि आधार योजनेशी लिंक केली जाईल.
मासिक रक्कम निश्चित करणे : योजनेसाठी मासिक रक्कम तुमच्या वयानुसार निश्चित केली जाईल. वयाच्या १८ व्या वर्षापासून शेतकऱ्यांना अंदाजे ५५ रुपये मासिक द्यावे लागतील, तर वयाच्या 40 व्या वर्षी प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांना अंदाजे २०० रुपये मासिक हप्ता द्यावा लागेल.
प्रमाणपत्र मिळवा : नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला CSC केंद्राकडून पेन्शन योजना प्रमाणपत्र (पेन्शन कार्ड) मिळेल, ज्यामध्ये तुमची रक्कम आणि पेन्शनबद्दल सविस्तर माहिती मिळेल.
फॉर्म भरा : योजनेचा फॉर्म भरण्यासाठी CSC केंद्रावर जावे लागेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. यात आधार क्रमांक, बँक खाते तपशील तसेच जमिनीची माहिती समाविष्ट करावी लागणार आहे.
फॉर्म सबमिट करा आणि पेमेंट करा : फॉर्म योग्यरित्या भरल्यानंतर सबमिट करा. तसेच योजनेचा शुल्क भरा.
योजनेचे मुख्य मुद्दे : शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना 3 हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल.
मासिक योगदान : शेतकऱ्याच्या वयानुसार, त्यांना ठराविक मासिक रक्कम द्यावी लागेल.
सुरक्षा : नोंदणीकृत शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या पत्नीला पेन्शनच्या निम्मी रक्कम (१ हजार ५०० रु) मिळेल.
स्वैच्छिक योजना : ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे. शेतकरी ती कधीही सोडू शकतो. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे.
ही योजना शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा देण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करते. अर्ज प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळते.