Pradhan Mantri Kisan Samman Nidhi :
वाशिम :
शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना' लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना १७ वा हप्ता मिळाला आहे. तर लवकरच १८ वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे.
शेतकऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता मिळाला आहे. परंतु शेतकऱ्यांना १८ व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. या योजनेंतर्गत, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक सहाय देण्याची घोषणा केली होती.
या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत असलेल्या मदतीमुळे शेतीच्या गरजा पूर्ण करण्यास मोठा हातभार मिळत आहे. जिल्ह्यातील १ लाख ६३ हजार ९९० शेतकऱ्यांना २ हजार रुपयाचा १८ वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे.
याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्यामुळे कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची मदत जमा होऊ शकते. गोरगरीब शेतकऱ्यांना यामुळे मोठा हातभार मिळणार आहे. आतापर्यंत सरकारने १७ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. तर लवकरच १८ वा हप्ताही वितरित होणार आहे.
कधी मिळणार १८ वा हप्ता?
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. जून महिन्याच्या मध्यावधीत योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांची केवायसी पुर्ण झालेली आहे. त्यांना १८ वा हप्ता सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोंबरमध्ये जमा होण्याचा अंदाज आहे.
केवायसी नाही, लाभ नाही !
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत त्यांना १८ व्या हप्त्याचे २ हजार रुपये मिळणार नाहीत.
• त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी ही प्रक्रीया पूर्ण करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांमध्ये आनंद
• प्रधानमंत्री किसान निधी अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ६३ हजार ९९० शेतकऱ्यांना २ हजार रुपयाचा १८ वा हप्ता मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
• थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा होणार आहे.