Lokmat Agro >शेतशिवार > राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय

राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय

Prime Minister's decision to establish a National Turmeric Board will benefit the turmeric farmers | राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय

राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय

करोनानंतर हळदीच्या मागणीत वाढ...

करोनानंतर हळदीच्या मागणीत वाढ...

शेअर :

Join us
Join usNext

हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजा आणि भविष्यातील शक्यतांचा विचार करता राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणा येथे  घेतला. 

भारत हा हळदीचा प्रमुख उत्पादक, उपभोक्ता व निर्यातदार असल्याचे सांगत करुणानंतर हळदीची जागतिक मागणी वाढल्याचेही त्यांनी सांगितले. हळदीचा उत्पादनापासून निर्यातीपर्यंत ते संशोधनापर्यंतच्या मूल्य साखळीकडे व्यावसायिक लक्ष देण्याची गरज असून हळद उत्पादक शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असेही पंतप्रधान म्हणाले.

हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजा व भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे मंडळ हळदीच्या पुरवठा साखळीतील पायाभूत सुविधांच्या संबंधित कामांपासून मूल्यसंवर्धनापर्यंतची सर्व मदत हळद उत्पादक शेतकऱ्यांना करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

 भारत हा प्रमुख हळद उत्पादक देश असून  जागतिक बाजारपेठेच्या एकूण उत्पादनापैकी 80 टक्के हळदीचे भारतात होते.  साधारण २७८ हजार मॅट्रिक टन एवढी हळद महाराष्ट्रातून जाते. मराठवाड्यातील हिंगोली तसेच सांगली, सातारा नांदेड परभणी हे महाराष्ट्रातील प्रमुख हळद उत्पादक जिल्हे आहेत.  

कोणत्या राज्याचे किती हळद उत्पादन?

Web Title: Prime Minister's decision to establish a National Turmeric Board will benefit the turmeric farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.