Join us

शेतकरी हितासाठी वाइन उद्योगास प्रोत्साहन योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 9:28 AM

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोविडच्या काळात २०२०-२१ मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती.

या योजनेत २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षात उद्योजकांनी व्हेंटचा भरणा केला आहे. त्यापैकी १६ टक्केप्रमाणे उद्योगांना व्हेंटचा परतावा दिला जाईल. सुका मेवा तसेच पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या योजनेत तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, सुका मेवा बनविणे तसेच पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार असल्यामुळे या योजनेस ५ वर्षासाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :द्राक्षेशेतकरीव्यवसायराज्य सरकारसरकार