कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या योजनांसाठी ॲग्री इन्फ्रा फंड (AIF) याअंतर्गत वर्ष २०२५-२६, पर्यंत १ लाख कोटी रुपये इतक्या एकूण वाटपांपैकी ८,४६० कोटी रुपयांची रक्कम महाराष्ट्र राज्याला तात्पुरती देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही योजना वर्ष २०२० पासून संपूर्ण भारतात कार्यान्वित करण्यात आली असून पात्र प्रकल्पांसाठी पात्र शेतकऱ्यांसह लाभार्थ्यांना मध्यम ते दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
एआयएफ योजनेद्वारे जिल्हानिहाय निधीवाटप प्रदान केले जात नाही.ही पायाभूत सुविधा युनिट्स म्हणजे प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, गोदामे, कोल्ड स्टोरेज आणि कोल्ड चेन, वर्गीकरण आणि ग्रेडिंग युनिट्स इत्यादी प्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त आणि उत्तम पायाभूत सुविधा देणारी केंद्रे आहेत. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या योजनांसाठी ॲग्री इन्फ्रा फंड यात सध्या महाराष्ट्रातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात प्रकल्प मंजूर झाले आहेत.