Join us

द्राक्ष छाटणी रखडली यंदा एकाच वेळी द्राक्षे बाजारात येण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 2:48 PM

महिनाभर सतत पडत असलेल्या पावसाने द्राक्ष पीक छाटणी रखडली होती. सध्या एकाच वेळी द्राक्ष छाटण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी पीक येणार व अपेक्षेप्रमाणे द्राक्ष दलाल दर पाडण्याची भीती व्यक्त होत आहे.

घाटनांद्रे : महिनाभर सतत पडत असलेल्या पावसाने द्राक्ष पीक छाटणी रखडली होती. सध्या एकाच वेळी द्राक्ष छाटण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी पीक येणार व अपेक्षेप्रमाणे द्राक्ष दलाल दर पाडण्याची भीती व्यक्त होत आहे.

गेला दीड महिना सततच्या रिमझिम पावसाने कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष पीक छाटणी ही रखडली होती. त्या छाटणीने सध्या वेग घेतला. तरीही अद्यापही बागेत साचलेल्या पाण्यामुळे निचरा बघूनच छाटणी घ्यावी लागत आहे.

तालुक्याच्या बहुतांश भागात द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मोठी आर्थिक उलाढालही होते. त्यामुळेच द्राक्ष हे बळीराजाचा आर्थिक कणा बनले आहे.

साधारणपणे ऑगस्ट महिन्यापासूनच द्राक्ष छाटणीला सुरुवात होते. तेथून पुढेच बळीराजा कल बघूनच आगास, मागास पद्धतीने छाटणी घेत असतात.

यंदा आता छाटणी घेण्यास सुरुवात झाली आहे. आता एकाच वेळी छाटणीची सर्वत्र लगबग सुरू झाल्याने पुढे येणारे द्राक्ष पीकही एकाच वेळी येणार आहे.

बागेत साचलेल्या पाण्यामुळे छाटणी किती ार हेही सांगता येईना. दिवस लांबणार हेही एकाच वेळी द्राक्ष छाटण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पीकही एकाच वेळी येणार व अपेक्षेप्रमाणे दलालही दर पाडण्याची शक्यता आहे. - उमेश शिवाजी शिंदे, शेतकरी, घाटनांद्रे

टॅग्स :द्राक्षेपीक व्यवस्थापनफळेफलोत्पादनसांगलीशेतकरीशेती