Lokmat Agro >शेतशिवार > Pusa Paddy Variety पुसाकडून तणनाशक सहनशील करणाऱ्या बासमती भाताच्या बियाण्याची विक्री सुरू

Pusa Paddy Variety पुसाकडून तणनाशक सहनशील करणाऱ्या बासमती भाताच्या बियाण्याची विक्री सुरू

Pusa Paddy Seed Launch of Herbicide Tolerant Basmati Rice Seed from Pusa | Pusa Paddy Variety पुसाकडून तणनाशक सहनशील करणाऱ्या बासमती भाताच्या बियाण्याची विक्री सुरू

Pusa Paddy Variety पुसाकडून तणनाशक सहनशील करणाऱ्या बासमती भाताच्या बियाण्याची विक्री सुरू

भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI), पुसा यांनी भाताच्या थेट पेरणीसाठी इमाझेथापायर १०% SL सहनशील first herbicide tolerant & non-GM rice varieties रॉबिनोवीड बासमती भात जातीच्या बियाणांची विक्री सुरू केली आहे.

भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI), पुसा यांनी भाताच्या थेट पेरणीसाठी इमाझेथापायर १०% SL सहनशील first herbicide tolerant & non-GM rice varieties रॉबिनोवीड बासमती भात जातीच्या बियाणांची विक्री सुरू केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI), पुसा यांनी भाताच्या थेट पेरणीसाठी इमाझेथापायर १०% SL सहनशील रॉबिनोवीड बासमती भात जातीच्या बियाणांची विक्री सुरू केली आहे. इमाजेथापीर सहनशील असलेल्या दोन बासमती जाती पुसा बासमती १९७९ आणि पुसा बासमती १९८५ आहेत.

यावेळी बोलताना डॉ. अशोक कुमार सिंग, संचालक, भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) म्हणाले, उत्तर-पश्चिम भारतातील भात लागवडीतील प्रमुख चिंता म्हणजे पाण्याची कमी पातळी, पुनर्लागवडीसाठी मजुरांची कमतरता आणि पुनर्लागवडीसाठी अधिकचे पाणी दरम्यान मिथेन वायूचे उत्सर्जन होते.

धानाची थेट पेरणी या सर्व चिंता दूर करू शकते. तथापि, भाताच्या थेट पेरणीखालील तण ही एक मोठी समस्या आहे जी भाताची थेट पेरणी यशस्वी करण्यासाठी सोडवणे आवश्यक आहे.

या दिशेने, ICAR-IARI, नवी दिल्ली यांनी केलेल्या संयुक्त संशोधनामुळे पुसा बासमती १९७९ आणि पुसा बासमती १९८५ या दोन रोबीनोव्हॉइड बासमती तांदळाच्या जाती विकसित केल्या गेल्या आहेत ज्या भारतात व्यावसायिक लागवडीसाठी दिल्या जाणाऱ्या पहिल्या जीएम विरहीत, तणनाशक सहनशील करणाऱ्या बासमती तांदळाच्या जाती आहेत.

डॉ. सिंग यांनी आवश्यक खबरदारीसह या दोन धानाच्या थेट पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रांचे तपशीलवार वर्णन केले. या दोन जाती, तणनाशक इमाझेथापीर १०% SL सहनशील असल्याने, भाताच्या थेट पेरणीत तणांच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतील, त्यामुळे बासमती भात लागवडीचा खर्च कमी होईल.

भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे कृषी आयुक्त डॉ. पी.के. सिंह यांनी इमाझेथापीर १०% SL सहनशीलता सारख्या तंत्रज्ञानासह या सुधारित तांदूळ वाणांच्या महत्त्वावर भर दिला. डॉ. डी.के. यादव एडीजी (सीड), आयसीएआर, नवी दिल्ली बासमती तांदळाच्या या दोन जाती देशातील बासमती जीआय क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतील, असेही म्हणाले.

पुसा बासमती १९७९
पुसा बासमती १९७९ हे तणनाशक इमाझेथापायर १०% SL ला सहनशील आहे. त्याची परिपक्वता १३०-१३३ दिवसांची आहे आणि बागायती लागवडीमध्ये त्याचे सरासरी उत्पादन ४५.७७ क्विंटल प्रति हेक्टर आहे.

पुसा बासमती १९८५
पुसा बासमती १९५८ तणनाशक इमाझेथापायर १०% SL ला सहनशील आहे. परिपक्वता कालावधी ११५-१२० दिवस आहे आणि बागायती लागवडीत त्याचे सरासरी उत्पादन ५.२ टन प्रति हेक्टर आहे.

Web Title: Pusa Paddy Seed Launch of Herbicide Tolerant Basmati Rice Seed from Pusa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.