Lokmat Agro >शेतशिवार > Rabi biyane : रब्बीहंगामासाठी ऑनलाइन नोंदणी करा; अनुदानित बियाणे मिळवा 

Rabi biyane : रब्बीहंगामासाठी ऑनलाइन नोंदणी करा; अनुदानित बियाणे मिळवा 

Rabbi biyane : register online for rabbi; Get subsidized seeds  | Rabi biyane : रब्बीहंगामासाठी ऑनलाइन नोंदणी करा; अनुदानित बियाणे मिळवा 

Rabi biyane : रब्बीहंगामासाठी ऑनलाइन नोंदणी करा; अनुदानित बियाणे मिळवा 

रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. (Rabi biyane)

रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. (Rabi biyane)

शेअर :

Join us
Join usNext

Rabi biyane : 

यवतमाळ :  यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाऊस कोसळला आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीचे नियोजन करता येणार आहे. शेतकऱ्यांना हे नियोजन करताना आर्थिक हातभार मिळणार आहे. त्यासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

यासाठी ऑनलाइन स्वरूपात बियाण्याची नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हे बियाणे उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात दोन लाख आठ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रारंभ करता यावा म्हणून शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

या कामात 'महाबीज'ने पुढाकार घेतला आहे. पेरणीकरिता जिल्ह्याला पाच हजार ८३० क्विंटल हरभऱ्याच्या बियाण्याची उपलब्धता करून दिली जाणार आहे. 
यामध्ये १० वर्षावरील बियाण्याच्या खरेदीसाठी किलोमागे १५ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे तर १० वर्षांच्या आतील बियाण्यासाठी किलोमागे २० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. अशा स्वरूपाचे ५९० क्विंटल हरभऱ्याचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच गव्हाचे बियाणेदेखील शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध होणार आहे. दोन्ही बियाणे मिळविताना प्रथम त्याची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे.

एका शेतकऱ्याला एक बॅग

अनुदान स्वरूपातील बियाण्याचे वितरण करताना एका शेतकऱ्याला एक बॅग दिली जाणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. यानंतरच या बियाण्याची बॅग शेतकऱ्यांना मिळणार आहे. ऑनलाइन वितरणानंतर उर्वरित बॅगा ऑफलाइन स्वरूपातील नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

Web Title: Rabbi biyane : register online for rabbi; Get subsidized seeds 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.