रब्बीकांदा लागवडीचे कामे सुरु होताना दिसत आहेत. यात रब्बी कांद्यासाठी रोपवाटिका तयार करण्याची कामे सुरु आहेत. रोपवाटिका तयार करताना काय काळजी घेतली पाहिजे ते पाहूया.
रोपवाटिका तयार करणे
- एक हेक्टर क्षेत्रासाठी १० ते १२ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी.
- जमिन हरळी व लव्हाळा तण विरहीत असावी.
- जमिन नांगरून कुळवून भुसभुशीत करावी.
- ३ ते ४ मीटर लांब, १ मिटर रुंद आणि १५ से.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत.
- प्रत्येक वाफ्यात १ घमेली चांगले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम मिश्र खत +२५ ग्रॅम फॉलीडॉल पावडर + २५ ग्रॅम कार्बेन्डॅझिम चांगल्या प्रकारे मिसळावी.
- ४-५ बोट अंतरावर रेषा पाडाव्यात व त्यात पातळ बी पेरून मातीने झाकावे व झारीने किंवा हलके पाणी द्यावे.
- ६ ते ८ आठवड्यात रोपे लागवडीस तयार होतात.
बियाणे पेरणी
- मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पेरणीपूर्वी २-३ ग्राम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्राम प्रति किलो प्रमाणे चोळावे.
- हेक्टरी ८-१० किलो बियाणे.
- विविध जाती - N-2-4-1, AFLR-ऍग्री फाउंड लाईट रेड, DOGR - भिमा शक्ती, भिमा किरण इ.
खत व्यवस्थापन
- २०-२५ टन कुजलेले शेणखत किंवा १० ते १५ टन गांडूळखत द्यावे.
- रासायनिक खते १००:५०:५० किलो नत्र स्फुरद पालाश द्यावे.
- लागवडीच्या वेळी अर्धा नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावा.
- उरलेला नत्र २५ व ४० दिवसांनी द्यावा.
- हेक्टरी ५० किलो गंधक लागवडी नंतर २१ दिवसांनी द्यावे.
कीड व रोग व्यवस्थापन
- करपा रोग: M-45, कार्बेन्डॅझिम, टॅबुकोनेझॉल या बुरशीनाशकांचा वापर करावा.
- फुलकिडे:
१) पिकांची फेरपालट करावी.
२) लागवडीनंतर ३० दिवसांनी ६०-७०% आर्द्रता असताना व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्राम/लिटर पाण्यातून ८-१० दिवसाचे अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
३) ५% निकोळी अर्काची फवारणी करावी.
४) प्रोफेनोफॉस १० मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १० मिली किंवा फेप्रोनील १५ मिली १० लिटर पाण्यात मिळसून फवारणी करावी व स्टीकरचा वापर करावा.
प्रा. राजेंद्र बिऱ्हाडे
प्रभारी अधिकारी, कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत
डॉ. योगेश पाटील
कृषि संशोधन केंद्र, निफाड