Join us

Rabbi Season 2024 : पाऊसमान चांगले झाल्याने रब्बी क्षेत्रात होणार का वाढ ? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 10:21 AM

रब्बीतील पेरण्यांसाठी एक महिना उलटून गेला तरी राज्यात आतापर्यंत केवळ १९ टक्के क्षेत्रावर म्हणजे ११ लाख ३४ हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या. (Rabbi Season 2024)

Rabbi Season 2024 : 

पुणे :रब्बीतील पेरण्यांसाठी एक महिना उलटून गेला तरी राज्यात आतापर्यंत केवळ १९ टक्के क्षेत्रावर म्हणजे ११ लाख ३४ हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या. सर्वाधिक सुमारे ४ लाख ९१ हजार हेक्टरवर पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. एकूण पेरण्यांत ३४ टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारी, १७ टक्के हरभरा व केवळ ४ टक्के सरासरी क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे.

पावसामुळे मशागत अपूर्णच पीकनिहाय विचार करता राज्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर इतके असून आतापर्यंत ६ लाख १३ हजार ५७८ हेक्टर अर्थात ३५ टक्के क्षेत्रावर पेरणी  झाली आहे.

राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५८ लाख ६० हजार १६९ हेक्टर आहे. कोल्हापूर विभागात ९९ हजार २८९ हेक्टर अर्थात विभागाच्या सरासरीच्या २९ टक्के, तर लातूर विभागात ३ लाख ७ हजार २९५ हेक्टरवर (विभागाच्या सरासरीच्या १९ टक्के) पेरणी झाली.  संभाजीनगर विभागातही १ लाख ४९ हजार ९५७ हेक्टरवर (सरासरीच्या १७ टक्के) पेरण्या झाल्या आहेत.

पावसामुळे मशागत अपूर्णच

• पीकनिहाय विचार करता राज्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर इतके असूनआतापर्यंत ६ लाख १३ हजार ५७८ हेक्टर अर्थात ३५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

• दिवाळीत अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाल्याने अद्यापही शेतीची मशागत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पेरणी लांबली.

• राज्यात १० लाख ४८ हजार ८०७ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, आतापर्यंत ४७ हजार १७० हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली. राज्यात २१ लाख ५२ हजार १४ हेक्टर हरभऱ्याची पेरणी होते. मात्र, आतापर्यंत ३ लाख ६४ हजार ६९२ हेक्टरवर अर्थात १७ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी होऊ शकली आहे.

थंडीचे प्रमाण वाढू लागल्यानंतर गहू व हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात वाढ होईल. यंदा खरिपात पाऊसमान चांगले राहिल्याने रब्बी पेरण्यांच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. - रफिक नाईकवाडी, संचालक, कृषी, पुणे

विभागनिहाय पेरणी  

विभागक्षेत्र (हेक्टरमध्ये)
पुणे४,९१,३६०
लातूर                ३,०७,२९५
छ. संभाजीनगर    १,४९,९५७
कोल्हापूर              ९९,२८९
अमरावती              ४७,२१२
नाशिक                  २१,७००
नागपूर                १७,२४८
कोकण                    १४
एकूण                  १,१३,४,०७५
टॅग्स :शेती क्षेत्ररब्बीशेतकरीशेती