Lokmat Agro >शेतशिवार > Rabi Perani : राज्यात ६० लाख हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी कृषी विभागाचा पहिला अंदाज

Rabi Perani : राज्यात ६० लाख हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी कृषी विभागाचा पहिला अंदाज

Rabi Perani : The first estimate of the Agriculture Department is that rabi will be sown on 60 lakh hectares in the state | Rabi Perani : राज्यात ६० लाख हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी कृषी विभागाचा पहिला अंदाज

Rabi Perani : राज्यात ६० लाख हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी कृषी विभागाचा पहिला अंदाज

यंदा राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या सुमारे ६० लाख हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आतापर्यंत अडीच लाख हेक्टर अर्थात पाच टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

यंदा राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या सुमारे ६० लाख हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आतापर्यंत अडीच लाख हेक्टर अर्थात पाच टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : यंदा राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या सुमारे ६० लाख हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आतापर्यंत अडीच लाख हेक्टर अर्थात पाच टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

यासाठी सुमारे १० लाख ४० हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून, सुमारे १२ लाख ४८ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक रफीक नाईकवाडी यांनी दिली.

सर्वाधिक २ लाख हेक्टरवर पेरणी पुणे विभागात झाली आहे. राज्यात १ जून ते १६ ऑक्टोबरपर्यंत सरासरीच्या तुलनेत ११६ टक्के पाऊस पडला आहे. राज्यात रब्बी हंगामात सरासरी ५३ लाख ९८ हजार हेक्टरवर पेरणी केली जाते.

मात्र, यंदा मॉन्सून तसेच परतीच्या पावसाने राज्यभर हजेरी लावल्याने रब्बी हंगामात यंदा ५९ लाख ९८ हजार हेक्टरवर (११० टक्के) पिकांची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

रब्बी ज्वारीसाठी ४ लाख ८५ हजार ५००, हरभऱ्यासाठी १२ हजार ३५०, मसूरसाठी ५० हजार असे एकूण ५ लाख ४७ हजार ८५० मिनी किट स्वरूपात बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यंदाच्या रब्बी हंगामात ३१ लाख ५० हजार टन खतांची मागणी असून, केंद्र सरकारकडून ती मान्य करण्यात आली आहे. तसेच मागील हंगामामधील १७ लाख ४४ हजार टन खतांचा साठा शिल्लक आहे. यंदाच्या हंगामासाठी सुधारित बियाण्यांचा पाठपुरावा करण्यावर भर देण्यात येत आहे.

पीक प्रात्यक्षिकांसाठी हरभऱ्याचे ८० हजार १८९ क्विंटल, गव्हाचे ४ हजार ६९ क्विंटल, रब्बी ज्वारीचे ५० हजार ५४७ क्विंटल, करडईचे २ हजार ६६६ क्विंटल तर जवसाचे ६२५ क्विंटल असे एकूण १ लाख ४० ८९७ क्विंटल बियाणे अनुदानावर शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

२ लाख ५८ हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी
राज्यात आतापर्यंत २ लाख ५८ हजार ८३ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली असून, सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ४.७८ टक्के इतके आहे. त्यात १ लाख ९८ हजार ७०९ हेक्टरवर रब्बी ज्वारी, १ हजार ९२२ हेक्टरवर गहू तर २१ हजार २०१ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे.

विभागनिहाय पेरणी
विभाग - हेक्टर - टक्के

नाशिक - १५६ - ०.०३
पुणे - २०२०५६ - १७.५८
कोल्हापूर - २४८६९ - ५.८४
संभाजीनगर - १२६५१ - १.७१
लातूर - १६७३४ - १.२३
अमरावती - ५७६ - ०.०८
नागपूर - १०४३ - ०.२४

Web Title: Rabi Perani : The first estimate of the Agriculture Department is that rabi will be sown on 60 lakh hectares in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.