Lokmat Agro >शेतशिवार > Rabi season 2024 : परतीच्या पावसाने विहिरींसह धरण, तलाव ओव्हरफ्लो ; मात्र रब्बी हंगामाच्या पेऱ्यात इतके टक्क्यांनी घट

Rabi season 2024 : परतीच्या पावसाने विहिरींसह धरण, तलाव ओव्हरफ्लो ; मात्र रब्बी हंगामाच्या पेऱ्यात इतके टक्क्यांनी घट

Rabi season 2024 : Dams, ponds overflow with wells due to return rains; But the Rabi season sowing has decreased by so much percentage | Rabi season 2024 : परतीच्या पावसाने विहिरींसह धरण, तलाव ओव्हरफ्लो ; मात्र रब्बी हंगामाच्या पेऱ्यात इतके टक्क्यांनी घट

Rabi season 2024 : परतीच्या पावसाने विहिरींसह धरण, तलाव ओव्हरफ्लो ; मात्र रब्बी हंगामाच्या पेऱ्यात इतके टक्क्यांनी घट

देशात रब्बी पिकांचे एकूण क्षेत्रात किती टक्के कोणत्या पिकांत वाढ झाली आणि कोणत्या पिकांत घट झाली ते वाचा सविस्तर Rabi season 2024

देशात रब्बी पिकांचे एकूण क्षेत्रात किती टक्के कोणत्या पिकांत वाढ झाली आणि कोणत्या पिकांत घट झाली ते वाचा सविस्तर Rabi season 2024

शेअर :

Join us
Join usNext

Rabi season 2024 : देशात रब्बी पिकांचे एकूण क्षेत्रात किती टक्के कोणत्या पिकांत वाढ झाली आणि कोणत्या पिकांत घट झाली त्याची सविस्तर माहिती आपण आज या लेखात पाहाणार आहोत. यंदा परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, मका, कपाशी सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.

२२ दिवसांच्या या परतीच्या पावसाने राज्यभरातील धरणांसह शेत विहिरी आणि गावातील तलाव ओव्हरफ्लो झाले. यातूनच खरीपातील पिकांचे आतोनात नुकसान झाले.

आता रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठी संधी होती. मात्र, यंदा ज्वारीसह गहु, हरभरा आणि मोहरीसारख्या पिकांच्या पेऱ्यात घट झाली असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

या अहवालात असेही म्हटले आहे की, ही घसरण मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास ७.४ टक्के इतकी झाली आहे. देशभरात रब्बी पिकांचे एकूण क्षेत्र ८ नोव्हेंबर रोजी पर्यंत १४६.०६ लाख हेक्टर पेरणी पूर्ण करण्यात आली होती. मागील वर्षी रब्बीचे १५७.७३ लाख हेक्टर होते, जे ७.४ टक्क्यांनी खाली घसरले आहे. राज्यांकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, गहू, हरभरा, मोहरी आणि ज्वारीचे एकरी उत्पादन घटले असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

गव्हाची पेरणी, रब्बी हंगामातील प्रमुख अन्नधान्य आहे. गव्हाची पेरणी ८ नोव्हेंबरपर्यंत ४१.३ लाख हेक्टरवर करण्यात आली.  जी मागील वर्षी ४८.८७  लाख हेक्टर होते. हरभऱ्याची पेरणी २७.४२ लाख हेक्टरवरून २४.५७ लाख हेक्टर वर घसरले आहे.  तर मोहरी ५०.७३ लाख हेक्टरवरून घसरून ४९.९० लाख हेक्टरवर आहे. ज्वारीची पेरणी काही भागांमध्ये हिवाळ्यात पिकवले जाते ८.९३ लाख वरून घसरून ६.६९ लाख हेक्टरवर आले आहे.

हिवाळी हंगामातील भाताचे क्षेत्र जवळपास बरोबरीचे आहे कारण मागील वर्षी ६.९९ लाख हेक्टरच्या तुलनेत ७.०४ लाख हेक्टर क्षेत्रात लावणी पूर्ण झाली आहे. रब्बी मक्याचे एकरी क्षेत्र १.८ लाख हेक्टरवरून २.७१ लाख हेक्टरवर जवळपास ५०.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मसूरची पेरणी देखील ११.२ टक्क्यांनी ४.२८ लाख हेक्टरवर नोंद करण्यात आली आहे. यंदा बार्लीची सुमारे ६९ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली. जी मागील वर्षी २७ हजार हेक्टर होती.

सरकारने चालू रब्बी हंगामात गव्हासाठी ११५ दशलक्ष टन, तांदूळ १४.५५ दशलक्ष टन, मका १२ दशलक्ष टन, हरभरा १३.६५ दशलक्ष टन, मसूर १.६५  दशलक्ष टन, मोहरीसाठी १३.८ दशलक्ष टन आणि बार्लीसाठी २.२५ दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.  पिकांचे एकरी क्षेत्रात हे उत्पादन निश्चित करण्यात आले आहे. शेतकरी पिकांची निवड करताना बाजारात कोणत्या पिकांना जास्त भाव मिळतो हे लक्षात घेऊनही पेरणी करतात.

२०२४-२५ या वर्षासाठी खरीप आणि रब्बी क्षेत्रात अन्नधान्याची मागणी निर्धारित केली जाते.  त्यात एकूण ३४१.५५ दशलक्ष टन अन्नधान्याच्या उद्दिष्ट  निर्धारित करण्यात आले आहे. रब्बी हंगामातील अन्नधान्यांचे योगदान १६४.५५ दशलक्ष टन असेल.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम मैदानी प्रदेशात गव्हाच्या पेरणीची वेळ २० नोव्हेंबरपर्यंत आहे आणि त्यानंतरची पेरणीला लेट रब्बी म्हटले जाते.

कृषी मंत्रालयातील एका माजी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पेरणीच्या क्षेत्रात घट होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात आणि
सरकारने या संदर्भात सर्वसमावेशक दृष्टीकोन घेणे आवश्यक आहे. ''सलग दोन वर्षे गव्हाचे अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाले, उत्तर-पश्चिम भागात पिकाची पेरणी २५ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण व्हायला हवी होती, जी आद्यापही पूर्ण करण्यात आली नाही.''

पिकांच्या कापणीच्या आधी तापमानात बदल झाल्यामुळे उत्पादनात त्याचा थेट परिणाम होते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी पिके काढणीस विलंब केले जातो, असे माजी वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले.

गव्हाला किफायतशीर भाव

गव्हाचे चांगले पीक येण्यासाठी आता कोणताही पर्याय नसल्याने खतांची वेळेवर उपलब्धता करण्यासाठी सरकारने रब्बी पेरणीच्या वेळी सजग राहण्याची सूचनाही त्यांनी केली. उत्तर प्रदेशात, काही जिल्ह्यांतील शेतकरी गहू कि ऊस पेरणी करावी या संभ्रमात आहेत. त्यासाठी अनुकुल हवामानाची वाट पाहत आहेत.

तज्ज्ञांनी सांगितले की, राज्य सरकारकडून उसाला राज्य सल्ला मूल्य (एसएपी) घोषणेला उशीर झाला आहे. त्यामुळे सध्याचे गव्हाचे दर अत्यंत किफायतशीर आहेत.

जलाशयांची पातळी किती ?

हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील उत्तरेकडील ११ जलाशयांची साठवण पातळी ७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या एकत्रित साठवण क्षमतेच्या १९.८३६ अब्ज घनमीटर (बीसीएम) च्या ६२ टक्के होती, तर वर्षभरात ती ७६ टक्के होती. मागील दहा वर्षांत सरासरी जलसाठा उत्तरेकडील भागात क्षमतेच्या ७६ टक्के उपलब्ध आहे. यूपी आणि मध्य प्रदेशातील साठवण पातळी सामान्य आणि वर्षापूर्वीच्या पातळीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे गहू, मोहरी आणि हरभरा हे मुख्यतः उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये घेतले जातात.

Web Title: Rabi season 2024 : Dams, ponds overflow with wells due to return rains; But the Rabi season sowing has decreased by so much percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.