Lokmat Agro >शेतशिवार > Rabi season 2024 : यंदा २ लाख ९५ हजार ८८६ हेक्टरवर क्षेत्रावर रब्बी हंगामात पीक पेरणीचे नियोजन वाचा सविस्तर

Rabi season 2024 : यंदा २ लाख ९५ हजार ८८६ हेक्टरवर क्षेत्रावर रब्बी हंगामात पीक पेरणीचे नियोजन वाचा सविस्तर

Rabi season 2024 : Planning of crop sowing in Rabi season on an area of 2 lakh 95 thousand 886 hectares this year Read in detail | Rabi season 2024 : यंदा २ लाख ९५ हजार ८८६ हेक्टरवर क्षेत्रावर रब्बी हंगामात पीक पेरणीचे नियोजन वाचा सविस्तर

Rabi season 2024 : यंदा २ लाख ९५ हजार ८८६ हेक्टरवर क्षेत्रावर रब्बी हंगामात पीक पेरणीचे नियोजन वाचा सविस्तर

यंदा मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा हरभरा, गहू पिकाकडे कल वाढताना दिसत आहे. (Rabi season 2024)

यंदा मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा हरभरा, गहू पिकाकडे कल वाढताना दिसत आहे. (Rabi season 2024)

शेअर :

Join us
Join usNext

Rabi season 2024 :

परभणी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने यंदाच्या रब्बी हंगामात २ लाख ९५ हजार ८८६ हेक्टरवर हरभरा, गहू, ज्वारी आदी पीक पेरणीचे नियोजन केले आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ८२ हजार ४५ क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे.

गेल्या खरीप हंगामात अवकाळी पावसाने जिल्ह्यात मोठी हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे असलेल्या जलस्रोतांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. या पाण्याच्या भरोशावर शेतकरी रब्बी हंगामात पारंपरिक पीक असलेल्या ज्वारीकडे कानाडोळा करून हरभरा, गहू पीक घेण्याकडे वळला आहे.

त्या अनुषंगाने कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्वारीसाठी १ लाख १३ हजार ८९ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

त्यापैकी आतापर्यंत ६६ हजार २५८ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी पूर्ण केली आहे. त्यापाठोपाठ ३९ हजार ३८ हेक्टर क्षेत्र गव्हासाठी प्रस्तावित केले असले तरीही ९ हजार क्षेत्रावर पेरणी केली आहे.

त्याचबरोबर १ लाख १२ हजार १७० हेक्टर क्षेत्र हरभऱ्यासाठी प्रशासनाने प्रस्तावित केले असले तरी आतापर्यंत १ लाख १ हजार ५५८ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी पूर्ण केली आहे.

आतापर्यंत २ लाख ९५ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ८२ हजार ४५ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. त्यामध्ये हरभऱ्याला सर्वाधिक पसंती आहे.

९० टक्क्यांवर हरभऱ्याची पेरणी उरकली

• मागील वर्षी शेतकऱ्यांनी खरीप हंगामात केलेला खर्चही उत्पादनातून निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी तयारी सुरू केली होती.

• शेतकऱ्यांनी आतापर्यंत १ लाख १ हजार ५५८ क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी केली आहे. जी की ९० टक्क्यांवर आहे. तर गव्हाच्या २३.३८ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

Web Title: Rabi season 2024 : Planning of crop sowing in Rabi season on an area of 2 lakh 95 thousand 886 hectares this year Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.