Lokmat Agro >शेतशिवार > Rabi Season 2024 : रब्बी बियाणे विक्री करण्यास सुरुवात; कोणती आहेत वाण ते वाचा सविस्तर 

Rabi Season 2024 : रब्बी बियाणे विक्री करण्यास सुरुवात; कोणती आहेत वाण ते वाचा सविस्तर 

Rabi Season 2024 : Rabi seed sales start; Read in detail what are the varieties  | Rabi Season 2024 : रब्बी बियाणे विक्री करण्यास सुरुवात; कोणती आहेत वाण ते वाचा सविस्तर 

Rabi Season 2024 : रब्बी बियाणे विक्री करण्यास सुरुवात; कोणती आहेत वाण ते वाचा सविस्तर 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून यंदाच्या (२०२४- २५) हंगामासाठी बियाणे उपलब्ध झाली आहेत.(Rabi Season 2024)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून यंदाच्या (२०२४- २५) हंगामासाठी बियाणे उपलब्ध झाली आहेत.(Rabi Season 2024)

शेअर :

Join us
Join usNext

Rabi Season 2024 : मागील वर्षी उत्पादित केलेली बियाणे यंदाच्या रब्बी (२०२४-२५) हंगामात पेरणीसाठी ज्वारी, करडई, हरभरा व गहू, जवस आदी पिकांची बियाणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय व कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी बिज प्रक्रिया केंद्र, परभणीने रब्बी पिकांच्या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहेत.
यात ज्वारी, हरभरा, जवस, करडई, गहू या पिकांची विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे बियाणे उपलब्ध केली आहेत.

रब्बी हंगामासाठी ५ नोव्हेंबरपासून बिज प्रक्रिया केंद्र, व.ना.म.कृ.वि, परभणी येथे ही बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परभणी विद्यापीठाचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. ए. शिंदे यांनी केले आहे. 

कोणती आहेत वाण

* ज्वारी पिकांत ४ प्रकारची वाण उपलब्ध आहेत.  परभणी शक्तीचे ४ क्विंटल बियाणे, सुपर मोती ११ क्विंटल, परभणी मोती ४ क्विंटल, परभणी ज्योती ८० किलो (csv-18)असून त्याचा दर हा ५०० रुपये प्रति बॅग याप्रमाणे आहे. 

* हरभरा पिकाचे परभणी चना नं-१६ या वाणाचे १ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्याचा दर हा १०० रुपये प्रति बॅग असा आहे. 

* जवस पिकाचे एलएसएल- ९३ या वाणाचे ४ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्याचा दर हा अनुक्रमे ६५० आणि २६० याप्रमाणे आहे. 

* करडई पिकाचे पीबीएनएस - ८३ या वाणाचे १० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्याचा दर हा ५५० रुपये प्रति बॅग याप्रमाणे आहे. 

* गहू पिकाचे एनआयएडब्ल्यु- १४१५ या वाणाचे ७ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्याचा दर हा २ हजार रुपये प्रति बॅग याप्रमाणे आहे.

Web Title: Rabi Season 2024 : Rabi seed sales start; Read in detail what are the varieties 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.