Lokmat Agro >शेतशिवार > Rabi Season : रब्बी हंगामात बियाण्यांसाठी करता येणार अर्ज; 'ही' आहे शेवटची तारीख

Rabi Season : रब्बी हंगामात बियाण्यांसाठी करता येणार अर्ज; 'ही' आहे शेवटची तारीख

Rabi Season Application for seeds subsidy and distribution can be made during Rabi season | Rabi Season : रब्बी हंगामात बियाण्यांसाठी करता येणार अर्ज; 'ही' आहे शेवटची तारीख

Rabi Season : रब्बी हंगामात बियाण्यांसाठी करता येणार अर्ज; 'ही' आहे शेवटची तारीख

Rabi Season : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचे नियोजन करण्यात आलेले आहे.  

Rabi Season : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचे नियोजन करण्यात आलेले आहे.  

शेअर :

Join us
Join usNext

Pune : खरीप हंगामातील पिके काढणीला सुरूवात झाली असून रब्बी हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचे नियोजन करण्यात आलेले आहे.  

चालू वर्षी हरभरा, गहू,  जवस , करडई, भूईमुग,  व मोहरी या पिकांचे महा-डीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार  आहेत. पीक प्रात्याक्षिके ही बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहेत.

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांचा २ हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे.

या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने  करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. २८ सप्टेंबर २०२४  ते दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Rabi Season Application for seeds subsidy and distribution can be made during Rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.