Lokmat Agro >शेतशिवार > Rabi Season : रब्बीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु; हरभऱ्याची पेरणी करताना 'ही' काळजी घ्या

Rabi Season : रब्बीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु; हरभऱ्याची पेरणी करताना 'ही' काळजी घ्या

Rabi Season: Farmers rush for Rabi; Take this care while sowing gram | Rabi Season : रब्बीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु; हरभऱ्याची पेरणी करताना 'ही' काळजी घ्या

Rabi Season : रब्बीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु; हरभऱ्याची पेरणी करताना 'ही' काळजी घ्या

रब्बी हंगामातील हरभरा लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. हरभरा पिकाचे व्यवस्थापन कसे करायचे ते जाणून घेऊयात सविस्तर (Rabi Season)

रब्बी हंगामातील हरभरा लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. हरभरा पिकाचे व्यवस्थापन कसे करायचे ते जाणून घेऊयात सविस्तर (Rabi Season)

शेअर :

Join us
Join usNext

Rabi Season :

चापोली : परिसरातील सोयाबीन काढणी उरकत आली आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या राशी केल्या असून, रब्बी हंगामातील हरभरा लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे.

हरभरा पीक हे रोपावस्थेत असताना यावर मर व मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीजप्रक्रिया करूनच हरभऱ्याची पेरणी करावी, असा सल्ला तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.

कृषी कार्यालयाकडून नुकतेच रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे तुरीला पाणी लागल्याने जळाले आहे.

पाझर तसेच साठवण तलाव ओव्हर फ्लो तर नदी, कालवे वाहत आहेत. विहीर व कूपनलिकेच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे, परिणामी गत वर्षाच्या तुलनेत यंदा हरभरा लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.

हरभरा पिकातील मर रोग फ्युजारीय ऑक्सझिस्पोरम या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव होताच झाडाची पाने पिवळी पडून कोमेजतात. झाडाची शेंडे मलूल होऊन हिरव्या अवस्थेतील झाड वाळते.

रोप उपटून पाहिले असता मुळे सडलेली दिसतात व सहज उपटली जातात. हरभरा पीक रोपावस्थेत असतानाच मर रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे हरभरा पीक पेरणीपूर्वी बीज प्रक्रियेची उपाययोजना करणे आवश्यक आहे, असा सल्ला तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आला आहे. कृषीकडून गावोगावी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे.

पंचसूत्रीचा अवलंब करावा

■ हरभरा हे रब्बी हंगामातील व्यवस्थापनास प्रतिसाद देणारे असे कडधान्याचे पीक असून, भरघोस उत्पादनाबरोबरच चांगला बाजारभाव मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या हे अतिशय फायदेशीर, असे हे पीक आहे.

■ हरभऱ्यासाठी पीक व्यवस्थापन करताना योग्य वेळ, बीज प्रक्रिया, सुधारित जातींचा वापर, सुधारित लागवड, आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर आणि पीक पोषण व दाण्याचे वजन वाढीसाठी अन्नद्रव्यांची फवारणी या पंचसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक असते, असे तालुका कृषी अधिकारी शिवचंद्रपाल जाधव यांनी सांगितले.

हरभरा लागवड केव्हा करावी

* २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान हरभरा लागवडीची योग्य वेळ आहे. या कालावधीनंतर नोव्हेंबर महिन्यात पेरणी केल्यास प्रत्येक आठवड्यात १ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन घटते, तसेच डिसेंबर महिन्यातील पेरणीमुळे उशीर झालेल्या प्रत्येक आठवड्यात हेक्टरी २ क्विंटल उत्पादन कमी मिळते.

* त्याचप्रमाणे २५ ऑक्टोबरच्या पूर्वीही हरभरा पेरणीची घाई केल्यास अगोदरच्या प्रत्येक आठवड्यामागे हेक्टरी २ क्विंटल उत्पादन घटते, असे मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले.

Web Title: Rabi Season: Farmers rush for Rabi; Take this care while sowing gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.