Lokmat Agro >शेतशिवार > सीमेवरील गावांत पाण्याअभावी रब्बी पेरा घटतोय

सीमेवरील गावांत पाण्याअभावी रब्बी पेरा घटतोय

Rabi sowing is decreasing due to lack of water in the border villages | सीमेवरील गावांत पाण्याअभावी रब्बी पेरा घटतोय

सीमेवरील गावांत पाण्याअभावी रब्बी पेरा घटतोय

पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वणवण करावी लागत आल्याचे चित्र आहे. 

पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वणवण करावी लागत आल्याचे चित्र आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

- रविंद्र शिऊरकर 

छत्रपती संभाजीनगर - नाशिक सीमेवरील गावात रब्बी नामशेष मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवरील काही गावांत रब्बी पेरा घटला असून खरिपातील कापूस पिकानंतर या भागात दुसरी पिके दिसून आली नसल्याचे सांगितले जात आहे. नाशिकच्या पूर्वेकडील शेवटचे गाव बोलठाणचा काही भाग,  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सीमेवरील जिरी, मनोली गावे, तसेच कन्नड तालुक्यातील जेऊर ते औराला दरम्यान रब्बी पिकांच्या लागवडी झालेल्या दिसून येत नसून या गावांत पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वणवण करावी लागत आल्याचे चित्र आहे. 

पावसाळाच्या सुरुवातीला काही प्रमाणात झालेला पाऊस वगळता पुढे चांगला पाऊस झाला नाही. ज्यामुळे बोलठाण कांदा मार्केट असल्याने या परिसरात लाल कांदा, रांगडा, उन्हाळी कांदा लागवड देखील अधिक प्रमाणात केली जाते. मात्र, या वर्षी पाणी नसल्याने कांद्याच्या लागवडी झाल्या नाही. 

कापसाचे आणि तुरीचे काही प्रमाणात उत्पन्न मिळाले. मात्र, त्यातून वार्षिक खर्च कसा काढायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला असून पुढील हंगामाच्या मशागतीकरिता देखील आर्थिक तारांबळ उडत असल्याचे शेतकरी सांगतात. 

कापसाचे भाव दबावाखाली

या वर्षी कोणत्याचं शेतकऱ्याला चांगले कापूस उत्पादन झालेले नाही, तरीही कापसाचे बाजार भाव दाबावाखाली आहेत. कांदासुद्धा पाण्याअभावी शेतकऱ्यांनी एकरभर क्षेत्रात करण्याऐवजी गुंठ्यात केला. त्याला सुद्धा निर्यात बंदी लावून भाव पाडण्यात सरकार यशस्वी झालं. एकंदरीत सरकार मरु पण देत नाही आणि जगू पण देत नाही सलाईनवर ठेवलेल्या आजरी रुग्णासारखं शेतकऱ्यांना जगवतं आहे. यात शेतकरी भरडला जात आहे. - संतोष पवार (शेतकरी जिरी)

Web Title: Rabi sowing is decreasing due to lack of water in the border villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.