Join us

राज्यात फक्त २८ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 9:29 AM

नोव्हेंबर महिन्यात रब्बीच्या बहुतांशी पेरणीची कामे होत असताना यंदा मात्र केवळ २८ टक्क्यांपर्यंतच पेरणी झाल्याने आगामी काळात उत्पादन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात पावसाची सरासरी यंदा १४ टक्क्यांपेक्षा खाली गेल्याने अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात रब्बीच्या बहुतांशी पेरणीची कामे होत असताना यंदा मात्र केवळ २८ टक्क्यांपर्यंतच पेरणी झाल्याने आगामी काळात उत्पादन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ५३.९७ लाख हेक्टर असून १६ नोव्हेंबरपर्यंत केवळ १५.११ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे.

राज्यात जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीतील पर्जन्य तूट, भूजलाची कमतरता, पेरणीखालील क्षेत्र व इतर निकष लक्षात पुनर्वसन हंगामासाठी महसुली घेऊन राज्याच्या मदत व विभागाने यंदाच्या १७८ तालुक्यातील ९५९ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी यंदाच्या रब्बी हंगामाचा पीक पेरणी व पीक परिस्थितीचा साप्ताहिक अहवाल तयार केला आहे.

पूर्वमशागत अंतिम टप्प्यात - रब्बी हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे अंतिम टप्यात आहेत. ज्वारी, हरभरा, गहू, मका व करडई पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. पेरलेली पिके उगवण ते रोप अवस्थेत आहेत. मागील आठवड्यात झालेला पाऊस रब्बी पिकांना लाभदायक ठरेल.- पुणे विभागात मक्यावर लष्करी अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.

टॅग्स :रब्बीशेतकरीपेरणीशेतीपाऊसराज्य सरकारदुष्काळ