Join us

शेतात पावसाने पाणी साठलंय? या पद्धतींनी अतिरिक्त पाण्याचा करा निचरा

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 13, 2024 1:32 PM

या पाच पद्धती येतील कामी..

राज्यात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याचीही नोंद झाली आहे. खरीप पेरण्यांच्या सुरुवातीला अत्याधिक पाऊस झाल्याने शेतात पाणी साठले जाऊ लागले तर पिकांसाठी हे हानिकारक ठरू शकते. मुळांना ऑक्सिजन मिळण्यास यामुळे अडथडे येऊन मातीची धूप होऊ शकते. परिणामी पिकांना रोग व किडीचा सामना करावा लागू शकतो.यासाठी वेळीच जमिनीवर साठलेले अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचा तज्ञ सल्ला देतात. यावर उपाययोजना काय?

चर करून पाणी काढणे

अनेक शेतकरी अतिरिक्त साठलेल्या पाण्याला वाहून जाण्यासाठी चर करून पाणी काढतात. शेतात वेगवेगळ्या आकाराचे आणि खोलीचे चर काढल्याने शेताच्या उताराच्या दिशेने पाणी वाहून जाते.

वाफे तयार करणे

जमिनीत मुरून साठलेल्या अतिरिक्त पाण्याला वाहून जाण्यासाठी वाफा पद्धत प्रभावी मानली जाते. रुंद वाफा आणि त्यामध्ये सरी तयार करून अतिरिक्त पाण्याचा प्रवाह या पद्धतीत नियंत्रित करता येतो. ही पाण्याचा निचरा करण्याची अधुनिक पद्धत मानली जाते. यात रुंद सरी ओरंबा पद्धतही प्रामुख्याने वापरली जाते.

पाण्याचा निचरा

निचरा प्रणाली (ड्रेनेज सिस्टिम) हा पाण्याचा निचरा करण्याचा सोपा मार्ग आहे. यात शेताच्या उताराच्या दिशेने चर खोदले जाते.ज्यात नैसर्गिकरित्या पाणी वाहून अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. ही पद्धत जमिनीच्या पृष्ठाभाग साठलेल्या अधिकच्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यात मदत करते.

शेतमिनीला उतार देणे

अनेक शेतकरी पारंपरिक जमिनीला उतार देण्याची पद्धत आजही वापरतात.हा अतिशय सोपा व प्रभावी उपाय मानला जातो. जेणेकरून पाणी नैसर्गिकरित्या वाहून जाते. पावसाच्या दिशेने किंवा नैसर्गिक जलवाहिन्या ज्या दिशेने असतील त्या बाजूनेदेखील उतार केला जातो.

मुलस्थानी जलसंधारण

या पद्धतीत शेताच्या उताराला आडवी पेरणी करतात. उताराच्या दिशेने चर तयार करून सरींच्या मध्ये आडवी पेरणी केली जाते. असे केल्याने जमिनीवरील माती तिथेच अडवली जाते. आणि वाहून जाणारे पाणी मुरून संरक्षित पाण्याचा स्त्रोत तयार होतो. करताना वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवण्यासाठी उताराला आडवी पेरणी केल्याने संरक्षित पाणी मिळते. जमिनीची धूप थांबवत

टॅग्स :पाऊसखरीपपाणी