Lokmat Agro >शेतशिवार > Rambutan Fruit : सोलापूर मार्केटमध्ये आलंय १ हजार रुपये किलोने विकले जाणारे हे नवीन फळ

Rambutan Fruit : सोलापूर मार्केटमध्ये आलंय १ हजार रुपये किलोने विकले जाणारे हे नवीन फळ

Rambutan Fruit : This new fruit is sold at 1000 rupees per kg in Solapur market | Rambutan Fruit : सोलापूर मार्केटमध्ये आलंय १ हजार रुपये किलोने विकले जाणारे हे नवीन फळ

Rambutan Fruit : सोलापूर मार्केटमध्ये आलंय १ हजार रुपये किलोने विकले जाणारे हे नवीन फळ

फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे तुम्हाला निरोगी तर ठेवतातच पण आजारांशी लढण्याची तुमची क्षमताही विकसित करतात.

फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे तुम्हाला निरोगी तर ठेवतातच पण आजारांशी लढण्याची तुमची क्षमताही विकसित करतात.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर: फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे तुम्हाला निरोगी तर ठेवतातच पण आजारांशी लढण्याची तुमची क्षमताही विकसित करतात.

जे दिसायला खूप विचित्र असले तरी त्याचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात; परंतु फार कमी लोकांना रामबुतान या फळाबाबत माहीत आहे. हे फळ दिसण्यासाठी लिचीप्रमाणे असते.

दक्षिण आशियाई देशांमध्ये हे फळ मोठ्या प्रमाणावर आढळणारे फळ शहरातील लक्ष्मी मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहे. ग्राहक एक किलोकरिता एक हजार रुपये देऊन खरेदी करत असल्याचे फळ विक्रेते फरीद शेख यांनी सांगितले.

यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, कॉपर, प्रोटीन, आयर्न आढळून असतात. त्याचबरोबर १०० ग्रॅम रामबुतान फळांमध्ये फक्त ८४ कॅलरी आढळून येतात. याव्यतिरिक्त या फळांमध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुण असतात. हे फळ आहारात असेल, तर अनेक विकारांपासून बचाव होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

अनेक आजारांवर फायदेशीर
-
जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक चांगला स्रोत आहे.
- वजन कमी करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते.
- बद्धकोष्टाची समस्या दूर होते.
- त्वचेवर उजाळा येतो.
- मधुमेहावरही यातून उपचार करता येतात.
- मँगनीज, झिक, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम ही खनिजे या फळात आढळतात.

पोषक घटक
चव थोडी गोड आणि आंबट असते. हे फळ दिसायला लहान वाटत असले तरी त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. हे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. याशिवाय कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम, कार्बोहायड्रेट, फायबर, ऊर्जा, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी, इत्यादींचा समावेश होतो.

शरीराला होणारे तोटे
रामबुतान फळात पोटॅशियम असल्यामुळे हे फळ जास्त प्रमाणात खाल्ले गेले, तर उलट्या आणि डायरिया होऊ शकतो.

Web Title: Rambutan Fruit : This new fruit is sold at 1000 rupees per kg in Solapur market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.