Join us

Ranbhaji: श्रावणात रानभाज्यांचे आहारातील महत्व कोणत्या दिवशी कोणती भाजी खातात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 12:08 PM

श्रावणात मिळणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्यांचे सेवन केल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. शिवाय दिवसानुसार आहारात कोणती भाजी खावी याचेही नियोजन असते.

विनोद भोईरपाली : श्रावणात मिळणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्यांचे सेवन केल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. शिवाय दिवसानुसार आहारात कोणती भाजी खावी याचेही नियोजन असते.

सोमवारी कैलीच्या पानांची भाजी करतात. शुक्रवारी जिवतीच्या फुलांची तर शनिवारी राजगिरा, कुई, कुळी, टाकळा आणि आम्लीच्या पानांची एकत्रित पंचभेळी भाजी करतात.

गौरी आणतात त्या दिवशी केनी व कुईच्या पानांची भाजी, तर वसुबारसेला गोवर्धन पूजा करताना सुरण, आळूकंद, करंदकंद आणि काशी कोहळा यांची भाजी करण्याची प्रथा आहे.

रानभाज्यांचे औषधी गुणधर्मकपाळफोडी : ही भाजी आमवात या संधिवाताच्या प्रकारात गुणकारी आहे. पोट गच्च होणे, मलावरोधसारख्या विकारात आराम मिळतो.कमेली : डोकेदुखीवर उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.करची भाजी : दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफ विकार यात ही भाजी उपयुक्त आहे.

विविध प्रकारच्या रानभाज्यारानभाज्या प्रकारांमध्ये अंबाडा, खरशिंग, दिंडा, लोथ, पेटा, भारंगी, अळू, तेरुली, फांगली, टाकळा, अग्निशिखा, रानतुळस, बांबू कोंब, रताळ्याचे कोंब, कवदर, कैला, टरली, कसविदा, कुड्याच्या शेंगा अक्रोड, अशा विविध प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश होतो.

रानभाज्यांचे आहारातील महत्त्व खूप आहे. शासन व कृषी विभागाने त्यांच्या विक्रीस प्रोत्साहन द्यावे. रानभाज्यांना हमीभाव द्यावा. जास्तीतजास्त रानभाज्या महोत्सव भरविण्यात यावा. - चंद्रकांत वाघमारे, अध्यक्ष आदिवासी समाज, सुधागड

टॅग्स :भाज्याश्रावण स्पेशलआरोग्यअन्नकोकण