देवगड तालुक्यामध्ये बहुतांश माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये रानभाजीचे एक दिवसीय महोत्सव झाले. आरोग्य सुदृढ राहण्याच्या दृष्टिकोनातूनच हे महोत्सव हितवर्धक ठरले आहेत.
यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रदर्शनाच्या माध्यमातून शाळेमध्ये रानभाज्या खरेदीसाठी त्या-त्या गावांमध्ये उच्चांकी गर्दी दिसून येत होती. असे महोत्सव वारंवार घेणे गरजेचे आहे. या महोत्सवांमुळे अनेक रानभाज्या हंगामी स्वरूपात देवगड तालुक्यातील विविध शाळांमध्ये विकल्या जात आहेत.
यामुळे आरोग्यासह अनेक गुणधर्म व फायदे असलेल्या रानभाज्या ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत. या रानभाज्यांची विक्री करून मुलांना नवे व्यावहारिक ज्ञान मिळत आहे.
सध्या गणेशोत्सव कालात बाजारपेठांमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या विक्रमी प्रमाणात विकल्या जात आहेत. यामध्ये विशेष करून गावरान कारल्याला जास्त प्रमाणात मागणी आहे.
जुलै महिन्यापासुन देवगड तालुक्यामध्ये रानभाज्या उपलब्ध झाल्यानंतर प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये एकदिवसीय प्रदर्शन घेऊन या भाज्या विकल्या गेल्या. या उपक्रमाला पालकांचीही मोठी साथ लाभली होती.
या भाज्यांना वाढली मागणी
सध्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकर चाकरमानीदेखील बाजारपेठांमध्ये रानभाज्या खरेदी करताना जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. तसेच काकडी, पडवळ, दोडकी, भोपला, कारली, अळू, लाल माठ, मुळा, मेथी या भाज्या मोतवा प्रमाणात विकल्या जात आहेत.
रानभाज्या आल्या पुन्हा आहारात
देवगड तालुका हा निसर्गसौंदर्याने दरी-डोंगरात वसलेला तालुका आहे. या तालुक्यात अनेक आरोग्याला आवस्यक असणाऱ्या रानभाज्या उपलब्ध आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी या रानभाज्या आहारामधून लुप्त होत होत्या. पुन्हा एकदा आरोग्याच्या दृष्टिकोनातून रानभाज्या जनतेच्या आहारात आल्या आहेत.
रानभाज्यांना आरोग्यामध्ये महत्त्व
उतारवयात होणारा हृदयविकाराचा आजार, कॅन्सर, मधुमेह अशा अनेक आजारांनी बालपणातच मनुष्याला ग्रासले आहे. यामुळे आपले आरोग्य सुद्ध ठेवण्यासाठी व्यायामाबरोबरच आपला आहार महत्त्वाचा असतो. विविध रानभाज्यांचे सेवन केल्यामुळे अनेक आजारांवर मात केली जाते. यामुळेच सध्या देवगड तालुक्यातील रानभाज्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड असल्याचे दिसून येत आहे. अनेक आवण्डा बाजारांमध्ये रानभाज्या विवाल्या जात आहेत. त्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मोठ्या प्रमाणावर रोजगार
विशेष करून पडेल कॅन्टीन, देवगड, शिरगाव, मिठबांव व गावागावांतील मुख्य बाजारेपठांमध्ये रानभाज्यांची विक्री केली जात आहे. गणेशोत्सव कालावधीत या रानभाज्यांची हजारो रुपयांची उलाढाल झाली असल्याचेही सांगितले जात आहे. येथील बहुतांश शेतकऱ्यांनी या भाज्यांची लागवड आपल्या शेतामध्येच केली आहे. यामुळे स्थानिकांनी शेतामध्ये पिकवलेल्या भाज्यांना स्थानिक बाजारपेठांसह परजिल्ह्यातही ग्राहकांची पसंती व मागणी वाढतच चालली आहे. तसेच देवगडमधील रानभाज्यांना मुंबईमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे देवगडमधील रानभाज्यांपासून मोठी रोजगार निर्मिती होत आहे.
विद्यार्थ्यांना मिळाला अनुभव
या महोत्सवातून विद्यार्थ्यांना रानभाज्या आरोग्यासाठी हितकारक कशा पद्धतीने आहेत. हे पटवूनही सांगत होते. व्यवसाय करण्याचा अनुभव य आरोग्याचा सल्ला यामुळे विद्याथ्यांना या महोत्सवातून एक वेगळाच अनुभव मिळत होता. तालुक्यातील बहुतांश शाळामधून रानभाजी महोत्सव भरवले होते.
बचतगटाच्या महिलांना रोजगाराची संधी
तालुक्यातील बचत गटाच्या माध्यमातूनही या भाज्या गावागावांतील बाजारपेठांमध्ये विकल्या जात आहेत, तसेच येथील बहुतांश शेतकरी आपल्या परसबागेमध्ये इतरही भाज्यांचे उत्पादन घेत आहेत. आठवडा बाजारांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिला कोकणी मेव्याचीदेखील विक्री फरत आहेत. यामुळे कोकणातील रानभाज्या व कोकणी मेव्याला एक मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली असून, अनेक ठिकाणांहून या उत्पादनाला मागणीदेखील केली जात आहे. यामुळे येथील बचत गटांच्या महिलांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे.
- अयोध्याप्रसाद गावकर