Lokmat Agro >शेतशिवार > वर्षातून एकदाच मिळणारा गुणकारी आतड्यांची ताकद वाढविणारा दुर्मिळ 'चिगूर'

वर्षातून एकदाच मिळणारा गुणकारी आतड्यांची ताकद वाढविणारा दुर्मिळ 'चिगूर'

Rare 'Chigur', a medicinal herb that is available only once a year and strengthens the intestines | वर्षातून एकदाच मिळणारा गुणकारी आतड्यांची ताकद वाढविणारा दुर्मिळ 'चिगूर'

वर्षातून एकदाच मिळणारा गुणकारी आतड्यांची ताकद वाढविणारा दुर्मिळ 'चिगूर'

ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात 'चिगूर' म्हणजे भोकरीच्या झाडाचा बहर दिसून येतो. चिगुर पासून तयारी होणारी भाजी ही एक प्रकारची रानभाजी आहे.

ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात 'चिगूर' म्हणजे भोकरीच्या झाडाचा बहर दिसून येतो. चिगुर पासून तयारी होणारी भाजी ही एक प्रकारची रानभाजी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात 'चिगूर' म्हणजे भोकरीच्या झाडाचा बहर दिसून येतो. चिगुर पासून तयारी होणारी भाजी ही एक प्रकारची रानभाजी आहे. जी वर्षातून एकदाच मिळते.

त्यामुळे अनेकजण चिगूर बाजारात येताच खरेदी करतात. तसेच आवडीने या भाजीचा आस्वाद घेतात.

भोकरीच्या झाडाचा बहर

दरवर्षी मार्च महिन्यात चिगूर म्हणजे भोकरचा फुलोरा येण्यास सुरुवात होते. ही रानभाजी (cordia dichotoma) या शास्त्रीय नावाने ओळखली जाते. या फुलोराची भाजी छान बनते. त्यामुळे अनेकजण हा फुलोरा झाडावर जाऊन तोडून त्याची भाजी तयार करून खाण्यावर भर देतात.

भोकरीची झाडं दुर्मिळ

सध्या भोकरीची झाडे दुर्मिळ होत चालली आहेत. जी झाडे आहेत ती मिस्तरी किंवा गवंडी घरावर स्लॅप टाकण्यासाठी आवश्यक असलेले प्लायवूड म्हणून या झाडाचा वापर करतात. त्यामुळे झाडांची संख्या कमी होत आहे.

आतड्यांची ताकद वाढवणारी भाजी

भोकरीचे झाड हे शीतल सावली देणारे आणि पक्ष्यांचे निवासस्थान असते. यावर सतत खारीचा वावर असतो. चिगूर तोडून खाल्ल्यास आतड्यांची ताकद वाढते.

चिगूर तोडणे अवघड काम

भोकरीच्या झाडावर आलेला चिगूर तोडून बाजारात विक्रीसाठी आणणे हे मोठे अवघड काम आहे. तरीही अनेकजण पोटाची खळगी भरण्यासाठी चिगूर तोडून बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात.

भाजी कशी खाणार?

भोकरीच्या झाडाला आलेला फुलोरा तोडून घ्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. तव्यावर तेल, हळद, मीठ, कांदा, मिरची पावडर टाकून थोडेसे पाणी टाकून शिजल्यास चविष्ट भाजी होते.

हेही वाचा : नारळाच्या नियमित सेवनाने मिळेल उभारी; सदृढ आरोग्याची नारळ आहे गुरुकिल्ली

Web Title: Rare 'Chigur', a medicinal herb that is available only once a year and strengthens the intestines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.