Ration Card E-kyc :
सोयगाव : तालुक्यातील रेशनकार्डधारकांना दिवाळीत देण्यात येणाऱ्या गव्हात कपात करण्यात आली असून त्याऐवजी ज्वारी देण्यात येणार आहे. यासाठी तालुक्याला १ हजार क्विंटल ज्वारी प्राप्त झाली आहे.
सोयगाव तालुक्यात विविध योजनेतील २४ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामध्ये अंत्योदय आणि अन्न सुरक्षा शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून १५ किलो गहू देण्यात येत होता.
आता त्यात ६ किलोची कपात करण्यात आली असून आता ९ किलो गहू, ६ किलो ज्वारी देण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील रेशन दुकानदारांसाठी १ हजार क्विंटल ज्वारी पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहे.
रेशनकार्डधारकांना देण्यात येणाऱ्या तांदूळ वितरणात मात्र कपात करण्यात आली नाही. यात अंत्योदय योजनेतील लाभार्थी रेशनकार्डधारकास ७ किलो तर अन्न सुरक्षा योजनेतील कार्डधारकास ४ किलो तांदुळ दिला जातो.
दरम्यान, ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर रेशन दुकानातून शिधापत्रिकाधारकांना साखरेचे मात्र वाटप होत नाही. वरिष्ठ पातळीवरून पुरवठा विभागाला साखरेचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांना कुठून साखर देणार, असे पुरवठा विभागातून सांगण्यात आले.
सोयगाव तालुक्याला दरमहा २५ क्विंटल साखरेची गरज भासते. विशेष म्हणजे सोयगाव तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना मार्च महिन्यापासून साखर मिळालेली नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी रेशनकार्डधारकांना साखरेविना साजरी करावी लागण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यात २ कोटी ४६ लाख २४ हजार ८८० शिधापत्रिकाधारक आहेत. यात कुटुंबातील महिला प्रमुख १ कोटी १३ लाख ८३ हजार ७३८ आहेत.
सदर आकडेवारी २८ ऑक्टोबरपर्यंतची आहे.
३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करावी लागणार
• रेशनकार्डधारकांना यापूर्वी ३१ सप्टेंबर ई-केवायसी पूर्ण करायची होती; परंतु त्यास ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
• आता पुन्हा मुदत ही ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
• ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही रेशनकार्डधारकाने ई- केवायसी केली नसल्यास रेशन मिळणार नाही.
हे वाचा
Ration Aadhar Card Link : रेशन कार्डला आधार लिंक करणे बंधनकारक; 'ही' आहे शेवटची तारीख वाचा सविस्तर
https://www.lokmat.com/agriculture/farming-ideas/ration-aadhar-card-link-mandatory-to-link-aadhaar-to-ration-card-this-is-the-last-date-read-in-detail-a-a1003/