Lokmat Agro >शेतशिवार > कडबा कुट्टी मशीन योजनेची ए टू झेड माहिती वाचा एका क्लिकवर 

कडबा कुट्टी मशीन योजनेची ए टू झेड माहिती वाचा एका क्लिकवर 

Read A to Z information about Kadaba Kutti Machine Scheme in one click | कडबा कुट्टी मशीन योजनेची ए टू झेड माहिती वाचा एका क्लिकवर 

कडबा कुट्टी मशीन योजनेची ए टू झेड माहिती वाचा एका क्लिकवर 

महाराष्ट्र सरकार दरवर्षीं कडबा कुट्टी योजना राबवत असते. यातून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देऊन कडबा कुट्टी मशीन पुरवण्यात येते.

महाराष्ट्र सरकार दरवर्षीं कडबा कुट्टी योजना राबवत असते. यातून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देऊन कडबा कुट्टी मशीन पुरवण्यात येते.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी म्हशी पाहायला मिळतात. अनेकजण पशुपालन व्यवसाय, दूध व्यवसाय करतात. अशावेळी जनावरांना चारा महत्वाचा असतो. जनावरांना चारा देण्यासाठी शेतकऱ्यांचा बराच वेळ खर्ची होत असतो. चाऱ्याचे तुकडे करा, चारा बारीक करा यामुळे इतर कामांना वेळ मिळत नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कडबा कुट्टी योजना अंमलात आणण्यात आली आहे. काय आहे ही योजना पाहुयात.... 

महाराष्ट्र सरकार दरवर्षीं कडबा कुट्टी योजना राबवत असते. अनेक शेतकऱ्यांकडून अर्ज मागवला जातो. यातून शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान देऊन कडबा कुट्टी मशीन पुरवण्यात येते. या कडबा कुट्टीचे अनेक फायदे असून विद्युत मोटर्सही जोडली असल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. जास्तीचा चारा अगदी कमी वेळेत कापता येतो. चारा बारीक केल्यानंतर जनावरांना खाण्यास सोपा जातो. शिवाय लवकर पचन होण्यास मदत होते. तसेच बारीक केलेल्या चाऱ्यास जागाही कमी लागते. शिवाय चाऱ्याची नासाडी कमी होते. 

कोण करू शकत अर्ज? 
महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणे गरजेचे आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षे पुढे पाहिजे. 

कागदपत्रं काय लागतील? 
या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. जमिनीचा सातबारा, ८ अ उतारा, आधार कार्ड, बँक खाते, विज बिल.  

किती अनुदान मिळतं?
कडबा कुट्टी योजनेसाठी 50 ते 75 टक्के अनुदान देते. जर समजा तुम्ही कडबा कुट्टी मशीन 20 हजार रुपयांना खरेदी केली. तर त्यावर योजेनच्या माध्यमातून 10 हजार इतकी रक्कम देण्यात येते. 

आता पाहुयात अर्ज कसा करायचा 

महाराष्ट्र शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या  https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer  या पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो. कडबा कुट्टी योजेनसाठी देखील याच पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागेल. या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमचा युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. जर तुम्ही याआधी नोंदणी केली नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी बटनावरती क्लिक करा. त्यानंतर नोंदणी करावयाची आहे. यानंतर पुन्हा होमपेजवर येऊन पुढील प्रक्रिया करावयाची आहे. 

लॉग इन करून अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक पुन्हा नवीन पेज लोड होईल, त्यामध्ये 'कृषी यंत्रणा पुढील बाबी निवडा', या बटनावर क्लिक करा. त्यानंतर पुढे एक अर्ज उघडेल, त्यामध्ये पहिला पर्यायामध्ये आपल्याला (कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य) हा पर्याय निवडा. त्यानंतर पुढच्या पर्यायांमध्ये (मनुष्य चलित अवजारे) हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर पुढील स्लाईडमध्ये कटर श्रेडरची निवड करा. हा पर्याय निवडल्यानंतर स्क्रिनवर मशीनचे प्रकार दिसतील. आपल्याला आवश्यक असलेल्या साईजनुसार मशीनचा पर्यायाची निवड करा. त्यानंतर खाली एक सूचना असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर जतन करा. यानंतर या अर्जासाठी 23 रुपये 60 पैशाचे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर अर्ज सबमिट होईल.

Web Title: Read A to Z information about Kadaba Kutti Machine Scheme in one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.