Join us

उजनी धरण ५० टक्क्याने भरले ; वाचा दिवसभरातील कृषीविषयक बातम्या एकाच क्लिकवर…

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 8:36 PM

आज दिवसभरात कृषिविषयक काय घटना घडल्या?  कोणत्या धरणात किती पाणीसाठा झाला? आजचे बाजारभाव काय? जाणून घेऊया...शेतकऱ्यांच्या जिवात जीव, उजनी ...

आज दिवसभरात कृषिविषयक काय घटना घडल्या?  कोणत्या धरणात किती पाणीसाठा झाला? आजचे बाजारभाव काय? जाणून घेऊया...

शेतकऱ्यांच्या जिवात जीव, उजनी धरण ५० टक्के भरले..

मागील २४ तासात उजनी धरणात पावणे तीन टीएमसी पाणी आल्याने उजनी अखेर ५० टक्के भरले असून, एकूण साठा ९१ टीएमसी एवढा झाला आहे. उजनी शंभर टक्के भरण्यासाठी २६ टीएमसी पाण्याची गरज आहे. उजनी ५० टक्के होताच माढा व करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सीना माढा उपसा सिंचन व दहिगाव उपसा योजनेतून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. उजनी ५० टक्के भरल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला आहे.

जगात पहिल्यांदाच जळगांवमध्ये कॉफी व मिरीच्या टिश्यूकल्चर रोपांची निर्मिती

केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी बटाटा पिकांच्या टिश्यूकल्चर रोपे उत्पादनानंतर प्रथमतःच कॉफी आणि काळी मिरी पिकांचे टिश्यूकल्चर पद्धतीने रोपे निर्मितीचे तंत्रज्ञान भारतात, तेही जळगावमध्ये विकसित झाले आहे. यामुळे कॉफी व काळी मिरी उत्पादकांना जनुकीयदृष्ट्या शुद्ध, एकसारखी व रोगमुक्त रोपांच्या उपलब्धतेमुळे उत्पन्न वाढीचा मार्ग गवसणार आहे.वाचा सविस्तर...राज्यात किती क्षेत्रावरील सोयाबीनवर 'पिवळा मोझॅक'चा प्रादुर्भाव?

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सध्या पिवळा मोझॅक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठा फटका सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. आधी पावसाचा खंड व खंडानंतर जास्तीचा झालेला पाऊस अशा हवामान बदलांमुळे झालेल्या पिवळा मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.काल मंत्रिमंडळ बैठकीतही सोयाबीन पीकाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर पिवळा मोझॅक तसेच खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. वाचा सविस्तर...

कांदा, सोयाबीनसह आजचे शेतमाल बाजारभाव असे आहेत

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू झाले असले, तरी भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला कमीत कमी ८०० रुपये, जास्तीत जास्त २५१८ आणि सरासरी २१५० रुपये बाजारभाव मिळाले. नागपूरमध्ये पांढऱ्या कांद्याला सरासरी ३७५० रुपये बाजारभाव मिळाला. वाचा सविस्तर

मिनी ट्रॅक्टरसाठी ३ लाखांचे अनुदान; काय आहे योजना?

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वाटप केली जातात. गेल्यावर्षी जिल्ह्यात ४८ बचतगटांना याचा लाभ देण्यात आला. दरम्यान, योजना सुरू झाल्यापासून गेल्या ११ वर्षात अहमदनगर जिल्ह्यात साडेचारशे बचतगटांना लाभ मिळाला आहे. वाचा सविस्तर...

ढवळे बंधूंनी मारली बाजी, हंगामात पहिल्यांदाच द्राक्ष आणून दहा गुठ्यांत सहा लाखांचे उत्पादन

बदलते पाऊसमान, वातावरणातील चढउतारालाही आव्हान देत शेतकरीशेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. असाच धाडसी प्रयोग कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील ढवळे बंधूंनी केला असून, यंदाच्या हंगामातील पहिली द्राक्षे त्यांनी बाजारात आणली आहेत. नंदकुमार ढवळे व विकास ढवळे यांनी उत्पादित केलेल्या द्राक्षांना प्रती चार किलो ५०१ रुपयांचा दर मिळवून त्यांनी बाजी मारली आहे. त्यांनी घेतलेल्या १० गुंठ्यांमध्ये सहा लाखांहून अधिकचे उत्पादन त्यांना मिळणार आहे. वाचा...

आमच्याकडच्या पाटाला कधी पाणी येणार? धरणातून किती विसर्ग होणार, मार्केट यार्डमध्ये शेतमालाचे आजचे भाव काय आहेत? विम्याचे अनुदान कधी मिळणार? दुध व्यवसायातील अडचणी कशा सोडवायच्या? अशा प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या शेतीच्या ताज्या बातम्या, घडामोडींसाठी आताच जॉईन करा ‘दैनिक लोकमत ॲग्रो’ डिजिटल दैनिकाचा व्हॉटस‌अप ग्रूप 

तसेच अशाच कृषिविषयक बित्तं बातम्यांसाठी लोकमत ॲग्रोच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा..

टॅग्स :शेतकरीधरणशेतीशेती क्षेत्रसरकारी योजना