Join us

अन्नसुरक्षेचे गंभीर रुप ओळखून या देशाने दिली सोयाबीन व मक्याच्या जीएम वाणाला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 12:19 PM

देशातील उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयात कमी करण्यासाठी या देशाचा महत्वाचा निर्णय

देशातंर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि धान्याचा साठा उपलब्ध रहावा यासाठी भारतात आयात निर्यातीवर निर्बंध लादले जात असताना चीनने आता सोयाबीन आणि मक्याचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी  सोयाबीन आणि मक्याच्या सुधारित जीएम वाणांच्या उत्पादनाला मान्यता दिली आहे.

१.४ अब्ज लोकसंख्येचा देश देशांतर्गत उत्पादनवाढीसाठी आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांद्वारे अन्नसुरक्षा सुधारण्यासाठी वर्षाला १०० दशलक्ष टनांहून अधिक धान्य आयात कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे सांगण्यात येत आहे.

मका आणि सोयाबीनचा हा जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे. २७ जीएम कॉर्न बियाणे आणि तीन जीएम सोयाबीनच्या वाणांना संमती चीनने दिली. उच्च उत्पादन देणाऱ्या पिकांचा विकास आणि लागवड वाढवण्यासाठी ते अशा मान्यता देत असल्याचे रॉयटर्सने सांगितले.

चीनच्या मंत्रालयाने १९ मार्च रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये मंजूर केलेल्या वाणांमध्ये  Dabeinong 002385.SZ आणि चायना नॅशनल सीड ग्रुप, Syngenta ग्रुपचे एकक यांच्या मालकीच्या बियाणे वाणांचा समावेश आहे.

चीनने अनेक वर्षांपासून जीएम पिकांच्या उपयोजनांबाबत सावधपणे वाटचाल केली आहे. परंतू पारंपरिक बियाणांच्या तूलनेत उत्पादन सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी प्रायोगिक प्रकल्पांनी चांगले परिणाम दर्शवल्यानंतर जानेवारीमध्ये ते जीएम सोयाबीन आणि कॉर्न लागवडीचा विस्तार करेल असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :सोयाबीनचीनलागवड, मशागत