Join us

भारतात यंदा रेकॉर्ड ब्रेक गहू उत्पादन! किमान आधारभूत किंमतही अधिक

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 04, 2024 3:00 PM

रब्बी गहु पेरण्यांचा शेवटचा टप्पा सुरु, पुढील आठवड्यापर्यंत...

हवामान परिस्थिती सामान्य राहिल्यास यंदा भारतात विक्रमी गहु उत्पादनाची अपेक्षा अन्न मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. २०२३-२४ वर्षात गव्हाचे उत्पादन ११४ दशलक्ष टनांच्या नव्या विक्रमाला स्पर्श करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या रब्बी गहु पेरण्यांचा शेवटचा टप्पा सुरु असून पुढील आठवड्यापर्यंत ही लागवड सुरु राहील. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यात ३२०.५४ लाख हेक्टरमध्ये देशात गव्हाची लागवड झाली. मागील वर्षात म्हणजे २०२२-२३ या पीक वर्षात गव्हाचे विक्रमी ११०.५५ दशलक्ष टन उत्पादन झाले. जे यंदा मोडीत निघेल अशी आशा आहे.

इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार गहू पिकाच्या पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तूलनेत वाढ दिसून आली आहे. काही राज्यांमध्ये एक टक्का तूट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भरून काढली जाईल, असे अन्न मंत्रालयाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक के मीना यांनी सांगितले. 

किमान आधारभूत किंमतही यंदा अधिक

गव्हाचा एमएसपी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचेही सांगण्यात आले आहे.गेल्या वर्षी एफसीआयची गहू खरेदी २६.२ दशलक्ष टन होती, जी वार्षिक १८.४ दशलक्ष टनांच्या बफर गरजेपेक्षा जास्त होती.

किती झाली गहु खरेदी?

धान्याच्या बाबतीत यावर्षी आतापर्यंत ४६.४ दशलक्ष टन खरेदी झाली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत ५३.४ दशलक्ष टनांपेक्षा कमी आहे. खरेदी कमी होण्याचे कारण म्हणजे खुल्या बाजारात धान्याचे दरही खूप अधिक आहेत.पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात धान खरेदी मंदावली आहे. कारण यावर्षी खुल्या बाजारातील भाव चढेच असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :गहूपीकपीक व्यवस्थापनहवामान