Join us

देशांतर्गत बाजारात गव्हाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना मिळतोय किलोमागे...

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 09, 2023 12:30 PM

यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. देशांतर्गत बाजारात मागील आठवड्यात गव्हाच्या किमतीत तीन ते चार रुपयांनी वाढ झाली ...

यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. देशांतर्गत बाजारात मागील आठवड्यात गव्हाच्या किमतीत तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. शेतकऱ्याला गव्हाला चांगला भाव मिळत आहे. 28 ते 29 रुपये किलोचा गहू 30 ते 31 रुपयांवर गेला आहे. 

गव्हाचा अतिरेकी साठा करण्यावर शेतकऱ्यांना बंधने असली तरी मिल चालकांकडून गव्हाची मागणी वाढली आहे. केंद्र सरकारने गहू, रवा, मैद्याच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळेही गव्हाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.

श्रावण महिन्यापासून सण उत्सव सुरू होतात. यावेळी गणेशोत्सव दसरा, दिवाळीत रवा, मैद्याची मागणी वाढते. त्यामुळे खाजगी मिलचालकांकडून कमी दर्जाच्या गव्हाला मागणी वाढते. या काळात भारतीय अन्न महामंडळाकडून नीलचालकांना गव्हाचा पुरवठा केला जातो. पण अन्न महामंडळाकडून अपेक्षित गव्हाचा पुरवठा यंदा होत नसल्यामुळे मिलचालकांनी खाजगी बाजारातून कमी दर्जाच्या गव्हाची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आहे. परिणामी देशांतर्गत बाजारातील गव्हाच्या किमती वाढल्या आहेत.

बाजारात तीस रुपयांहून अधिक दराने विक्री होणाऱ्या गव्हाच्या घरात सध्या कोणतीही वाढ झालेली नसून दर्जेदार गव्हाच्या किमती ही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :शेतकरीशेतीशेती क्षेत्रपीक