हदगाव तालुक्यातील धानोरा (रुई) येथील एका शेतकऱ्याने एका एकरामध्ये हळदीचे विक्रमी ४० - क्विंटल उत्पन्न घेतले आहे. विशेष म्हणजे सध्या उत्पन्न जास्त झाले आणि बाजारात हळदीला भाव देखील वाढवून मिळत असल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
हळद पीक काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. यामुळे हळद पीक नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ बहुतांश हळद उत्पादक शेतकऱ्यांवर आली होती; परंतु हळदीचे उत्पन्न पाहता बाजारपेठेत भाव गडगडतील अशी शेतकऱ्यांना भीती होती. मात्र बाजारपेठेत हळदीला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
धानोरा (रुई) येथील गणेशराव शिंदे यांना एका एकरमध्ये ४० क्विंटल उत्पन्न त्यांनी घेतले आहे. सध्या हळदीला १६ हजार रुपयेपेक्षा अधिक प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
turmeric Market: सांगलीत राजापूरी हळदीला झळाळी, क्विंटलमागे असा भाव मिळतोय
राज्यात सध्या हळदीला क्विंटलमागे चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे १३ ते १४ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. अवकाळी पावसापासून पीक वाचवताना शेतकऱ्यांची धावपळ होत असताना बाजारभाव चांगला मिळत असल्याने हळद उत्पादकांना दिलासा मिळत आहे.