Join us

महाराष्ट्र कृषी विभागात तब्बल २१८ जागांसाठी भरती; दहावी पास विद्यार्थ्यांनाही संधी, कुठे कराल अर्ज? 

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 17, 2023 7:28 PM

महाराष्ट्र कृषी विभागात तब्बल २१८ जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लघुटंकलेखक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक अशा ...

महाराष्ट्र कृषी विभागात तब्बल २१८ जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लघुटंकलेखक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक अशा  विविध पदांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना यासाठीhttps://www.krishi.maharashtra.gov.in/या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि महत्वाच्या तारखांची साविस्तर माहिती जाणून घेऊया.. 

एकूण पदे - २१८रिक्त पदाचे नाव - लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी)शैक्षणिक पात्रता: माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण.  लघुलेखन गती किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन गती किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

वरिष्ठ लिपिक - १०५ जागाशैक्षणिक पात्रता - किमान द्वितीय श्रेणी पदवीधर 

सहाय्यक अधीक्षक - ५३ जागा शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी 

वयोमर्यादा -  १८ ते ४० वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गासाठी – ०५ वर्षे सूट)परीक्षा फी - ७२०/- रुपये. (मागासवर्गीय /आ. दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक - रु. ६५०/-रुपये)

पगार

  1. लघुटंकलेखक - २५,५००- ८१,१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
  2. लघुलेखक (निम्न श्रेणी)- ३८६००-१,२२,८०० (सुधारित - एस-१५ : ४१,८००-१,३२,३००) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
  3. लघुलेखक (उच्च श्रेणी) - ४१,८०० - १,३२,३०० (सुधारित - एस-१६ : ४४,९०० - १,४२,४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

 अधिक माहितीसाठी https://www.krishi.maharashtra.gov.in/ संकेतस्थळाला भेट द्या. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेती