नासीर कबीरकरमाळा : अलीकडच्या काळात तरुण शेतकरीशेतीत नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. पारंपरिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पद्धतीनं शेती करत भरघोस उत्पादन घेता येतं, तर काही उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या मागे न लागता यशस्वी शेती करताहेत.
अशाच एका सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं 'लाल केळी'च्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. अभिजित पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालक्यातील वाशिंबे या गावात त्यांनी लाल केळीचं यशस्वी उत्पादन घेतले आहे.
लाल केळीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. सध्या एक किलोला ५५ ते ६० रुपयांचा दर मिळत आहे. चार एकर क्षेत्रावर ६० टन माल निघाला होता. यातून त्यांना खर्च जाऊन ३५ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाल्याची माहिती पाटील यांनी दिली. लाल केळी ही औषधी असते. त्यामध्ये पोषण गुणधर्म जास्त असतात.
मुंबई, पुणे, नागपूर या मेट्रो शहरांमध्ये उच्च व श्रीमंत वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात लाल केळीला मागणी आहे. तसेच मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्येदेखील लाल केळीला मोठी मागणी आहे. पहिल्या चार एकर क्षेत्रावर लाल केळी होती. यावर्षी आणखी एक एकर क्षेत्रावर लाल केळीची लागवड केली आहे. - अभिजित पाटील, लाल केळी उत्पादक, वाशिंबे, ता. करमाळा
अधिक वाचा: Award for Farmers : महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिले जाणारे पुरस्कार कसे व्हाल सहभागी