लसणापाठोपाठ आता लाल मिरचीच्या किमती २० ते २५ टक्के वाढल्या आहेत. यात आणखी वाढ होऊ शकते, असा व्यावसायिकांचा अंदाज आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
मियाचाउंग वादळामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील मिरच्यांचे पीक मोठ्या प्रमाणात वाया गेले आहे. कर्नाटकातही कमी पावसामुळे उत्पादन घटले आहे. त्यामुळे लाल मिरच्यांची मागणी व पुरवठ्याचे गणित कोलमडले आहे.
अधिक वाचा: घरोघरी वर्षभर पुरणारे तिखट करण्याची लगबग; कसा आहे लाल मिरचीचा बाजारभाव
त्यातच यंदा मिरच्यांची निर्यातही मजबूत आहे. चीनमध्ये तेजा जातीच्या भारतीय लाल मिरचीस मोठी मागणी आहे. अशा अनेक कारणांमुळे लाल मिरच्या महागल्या आहेत.
क्षेत्र वाढले तरीही..■ यंदा लाल मिरच्यांचा पेरा १२ टक्के वाढला, मात्र, पावसाने नुकसान केल्याने उत्पादन ५ टक्के कमी होण्याची शक्यता आहे.■ भाववाढीमुळे ग्राहकांच्या किचनचे गणित बिघणार असले तरी शेतकऱ्यांना लाभ होईल. तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या मिरची उत्पादक राज्यांतील शेतकऱ्यांना या भाववाढीचा थेट फायदा होऊ शकतो.