Lokmat Agro >शेतशिवार > नारळाच्या नियमित सेवनाने मिळेल उभारी; सदृढ आरोग्याची नारळ आहे गुरुकिल्ली

नारळाच्या नियमित सेवनाने मिळेल उभारी; सदृढ आरोग्याची नारळ आहे गुरुकिल्ली

Regular consumption of coconut will provide vitality; coconut is the key to good health | नारळाच्या नियमित सेवनाने मिळेल उभारी; सदृढ आरोग्याची नारळ आहे गुरुकिल्ली

नारळाच्या नियमित सेवनाने मिळेल उभारी; सदृढ आरोग्याची नारळ आहे गुरुकिल्ली

Healthy Coconut : नारळ हे एक पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असे फळ आहे. आपल्या आहारात नारळाचा समावेश केल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होतात.

Healthy Coconut : नारळ हे एक पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असे फळ आहे. आपल्या आहारात नारळाचा समावेश केल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होतात.

शेअर :

Join us
Join usNext

नारळ हे एक पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असे फळ आहे. आपल्या आहारात नारळाचा समावेश केल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होतात.

तसेच नारळाचे पाणी, नारळाचे दूध आणि नारळाच्या इतर विविध उपयोगांमुळे तो आपल्यासाठी आरोग्यदायी ठरतो. नारळाचे आरोग्यदायी फायदे आणि त्याचा उपयोग पाहूयात.

कफ, वात, पित्त प्रकृतीसाठी 

नारळ आणि नारळपाणी हे कफ, वात आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तीसाठी गुणकारी मानले जाते. ते शरीराच्या उबदारपणाला नियंत्रणात ठेवते आणि आरोग्य सुधारते.

पोषकद्रव्यांनी परिपूर्ण 

नारळामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार, प्रथिने आणि स्निग्धांश मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे नारळ हा अत्यंत पोषकद्रव्यांनी भरलेला असतो. तो संपूर्ण शरीरासाठी आवश्यक असलेले पोषण प्रदान करतो.

तहान भागविण्यासाठी 

उन्हाळ्याच्या गरम दिवसांत जेव्हा सतत तहान लागते, तेव्हा नारळपाणी प्यायल्यास ताजेतवाणं वाटते आणि तहान लगेच भागते. नारळपाणी शरीरातील पाणी स्तर नियंत्रित ठेवते.

त्वचेचे आरोग्य 

पावसाळ्यात त्वचा तेलकट होण्याची समस्या असते, त्यासाठी नारळ पाणी उपयुक्त ठरते. चेहऱ्यावर नारळ पाणी लावल्यास त्वचा ताजीतवानी आणि नितळ राहते. तसेच त्वचा उजळते आणि ताजेतवानी राहते.

बाळाच्या वाढीमध्ये सुधारणा

गर्भधारणेनंतर नारळ पाण्याचा नियमित वापर केल्याने बाळाच्या वाढीमध्ये सुधारणा होऊ शकते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा नारळ पाणी प्यायल्यास बाळाची त्वचा सुंदर आणि चमकदार होऊ शकते.

हृदयासाठी फायदेशीर 

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी नारळ अत्यंत उपयुक्त ठरतो. यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि हृदयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते.

केसांसाठी फायद्याचे

पावसाळ्यात केस तेलकट होऊन त्यात गळणे सुरू होऊ शकते. यासाठी नारळ पाणी केसांना लावून मालिश केल्याने केस मुलायम आणि मजबूत होतात. मुळांचे पोषण चांगले होऊन केसांची वाढ होते. नियमितपणे नारळ पाणी केसांना लावल्याने ते निरोगी राहतात.

शक्तीवर्धक आणि ऊर्जा देणारे 

नारळाचे दूध शक्तीवर्धक मानले जाते. याचे सेवन केल्यास भूक ताबडतोब भागविली जाते आणि ऊर्जा मिळते. नारळाचे दूध आपल्या शरीराला ताजेतवाणं आणि सुदृढ ठेवते.

पचनक्रिया आणि वजन कमी करणे 

नारळ पाणी पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. ते आपल्या पचन संस्थेवर चांगला प्रभाव टाकते आणि आहारातील अन्न योग्य पद्धतीने पचवते. तसेच नारळ पाणी वजन कमी करण्यासाठीही उपयोगी आहे. यामुळे शरीरातील वसा कमी होण्यास मदत होते.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदतगार

नारळ पाणी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविते. ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते आणि इन्फेक्शन्सपासून संरक्षण करते.

वरील प्रमाणे नारळ हा एक अत्यंत फायदेशीर आणि बहुउपयोगी पदार्थ आहे. त्याचे नारळाचे नियमित सेवन आपल्याला ताजेतवानी ठेवते, शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि हृदयाच्या आरोग्याला फायदेशीर ठरते. त्यामुळे आपल्या आहारात नारळाचा समावेश करून आपण आरोग्यदायी आणि ताजेतवाणं जीवन जगू शकतो. 

मात्र विविध व्याधींमध्ये नारळ पाण्याचा अधिकाधिक वापर करण्याआधी आपल्या वैद्यकीय सल्लागारांशी चर्चा करणे गरजेचे आहे. 

हेही वाचा : वर्षभर मागणी असलेल्या चिंचेच्या 'या' मूल्यवर्धित पदार्थांचा प्रक्रिया उद्योग उभारून कमवा आधिकाधिक नफा

Web Title: Regular consumption of coconut will provide vitality; coconut is the key to good health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.