Join us

गूळ शेंगदाणे नियमित सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीपासून होते सुटका; हाडेही होतात मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 11:50 AM

गूळ शेंगदाण लई फायद्याचे

शेंगदाण्यात स्निग्धता असल्याने पोटाच्या तक्रारीवर फायदेशीर ठरते. याच्या नियमित सेवनामुळे गॅस, अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळते. तसेच महिलांनी गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्यास हिमोग्लोबीनही वाढते.

रोज शेंगदाणे खाल्ल्याचे फायदे खाणाऱ्यांनाही माहिती नसतील. ओला खोकला असल्यास त्यावर शेंगदाणा उपायकारक ठरतो. यामुळे पाचनशक्तीही वाढते. तसेच भूक न लागण्याची समस्याही दूर होते. गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमित सेवन करणे चांगले आहे.

यामुळे गर्भावस्थेत मुलाच्या विकासासाठी मदत होते. शेंगदाण्यात ओमेगा फॅट अधिक प्रमाणात असून, ते त्वचेसाठी उपयुक्त असते. शेंगदाण्यामुळे कोलेस्ट्रॉल नियमित राहण्यास मदत होते.

शरीरातील कोलेस्ट्रॉल राहतो नियंत्रणात

जेवणानंतर ५० ते १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते. खाल्लेले भोजन पचते. शरीरात रक्त्ताची कमतरता होत नाही. शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतो. कोलेस्ट्रॉल प्रमाण ५.१ टक्क्यापर्यंत कमी होते. बहुतांश जणांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर धोका वाढतो. त्यामुळे गुळ शेंगदाणे फायदेशीर ठरते.

हार्मोन्सचे संतुलन कायम राहते

शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डीची मात्रा अधिक असते. त्यामुळे हाडेही मजबूत होतात. रोज थोड्या थोड्या प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास महिला आणि पुरुषांमध्ये हार्मोन्सचे संचलन कायम राहते.

हिमोग्लोबीन कमी होण्याची लक्षणे शरीराला अशक्तपणा आल्यास तुमच्या रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी ढासळते. लाल रक्तपेशी आणि अॅनिमिया हे हिमोग्लोबीनची पातळी कमी होण्याचे प्रमुख कारण आहे.

थायरॉईडची लक्षणे

अचानक वजन वाढणे, घसा खवखवणे, हृदयाच्या गतीमध्ये बदल होणे, मूड बदलणे, केस गळणे मासिक पाळी अनियमित होणे, उच्च रक्तदाब, झोप ना येणे. स्नायूंमध्ये दुखणे, चेहऱ्यावर सूज येणे, कोरडी त्वचा, थकवा येणे. 

दरम्यान, पालेभाज्या, सफरचंद, अंगूर, पेंडखजूर, अंजिर, बीट आदींचे नियमित सेवन केल्यानेही हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविता येते.

आहारात लोहाचे प्रमाण वाढवा

■ ज्या लोकांना रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी नैसर्गिक पद्धतीने वाढवायची आहे, त्यांच्यासाठी हा एक साधा आणि सोपा उपाय आहे. लोहयुक्त आहार घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबीन नक्कीच वाढू शकते.

■ ज्यामुळे हळूहळू तुमच्या शरीरातील लाल रक्तपेशी नक्कीच वाढू शकतात. आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुका मेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, बीट, गाजर अशा पदार्थाचा समावेश करून तुम्ही तुमच्या आहारातील लोहाचे प्रमाण वाढवू शकता.

हेही वाचा - गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने

टॅग्स :फळेआरोग्यशेतकरीशेतीपीक