Lokmat Agro >शेतशिवार > तुमच्याही मोसंबी बागेत होतेय फळगळ, काळजी करू नका, असे करा उपाय

तुमच्याही मोसंबी बागेत होतेय फळगळ, काळजी करू नका, असे करा उपाय

Remedies for fruit drop in sweet lemon mosambi orchards | तुमच्याही मोसंबी बागेत होतेय फळगळ, काळजी करू नका, असे करा उपाय

तुमच्याही मोसंबी बागेत होतेय फळगळ, काळजी करू नका, असे करा उपाय

मोसंबी बागेमध्ये फळगळ मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यामध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सध्याची फळगळीचे प्रमाण जास्त आहे.

मोसंबी बागेमध्ये फळगळ मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यामध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सध्याची फळगळीचे प्रमाण जास्त आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीत मोसंबी बागेमध्ये फळगळ मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे यामध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सध्याची फळगळ चे प्रमाण जास्त आहे.

सध्याच्या परिस्थितीत खालीलप्रमाणे नियोजन करा.

  • पाण्याची योग्य व्यवस्थापन.
  • पाणी खोडाजवळ न देता खोडापासून योग्य अंतरावर द्यावे.
  • नत्राच्या कमतरतेमुळे होणारी फळगळ कमी करण्यासाठी एक किलोग्राम युरिया+ ३० एम एल प्लानोफिक्स प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
  • तसेच जमिनीच्या माध्यमातून प्रति झाड ५०० ग्रॅम युरिया दिल्यास अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारे फळगळ कमी करू शकतो.
  • गळलेली फळे गोळा करून बागेच्या बाहेर काढावीत कारण अशी गळलेली फळे बागेमध्ये रोगाचे विरजण म्हणून काम करतात व रोगाची लागण करतात.
  • फळमाशीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रति एकर ५ फळमाशीचे सापळे लावा.
  • रस शोषण करणाऱ्या किडींच्या  उदा. काळी माशी, पांढरी माशी, सायला व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत.
  • रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम २५ डब्ल्यू. जी. १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिश्रण करून फवारणी करावी.
  • अळीवर्गीय कीटकांच्या व्यवस्थापनासाठी बॅसिलस थुरीनजिनिसिस (बीटी) पावडरची २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी करावी.
  • जमिनीचा सामू तसेच पाण्याचा सामू (pH) जोपर्यंत ६.५ ते ७.५ या दरम्यान असत नाही तोपर्यंत जमिनीमध्ये मूळतः असणारी अन्नद्रव्य तसेच वरखत च्या माध्यमातून देण्यात आलेली अन्नद्रव्य झाडास लागू होत नाहीत. यासाठी झाडाच्या मुळाच्या सभोवतालचा सामू महत्त्वाचा उदासीन करणारे घटक वापरावेत.
  • बागेतील आणि आजूबाजूस असलेली गुळवेल, वासनवेल, चांदवेल इत्यादी चा बंदोबस्त करावा कारण या वनस्पती फळातील रस शोषण करणाऱ्या पतंग या किडीसाठी पर्यायी वनस्पती म्हणून काम करतात.
  • बाग स्वच्छ ठेवावी.

कार्यक्रम समन्वयक
कृषी विज्ञान केंद्र खामगाव (बीड II)

Web Title: Remedies for fruit drop in sweet lemon mosambi orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.