Pune : देशातील काही राज्यांतील निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. बिगर बासमती तांदळावरील निर्यातबंदी केंद्र सरकारने हटवली असून आता किमान निर्यात मूल्य ४९० डॉलर प्रती टन या दराने सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात करता येणार आहे. यापूर्वी केवळ बासमती तांदळाची निर्यात करता येणे शक्य होते. तसेच साध्या तांदळाची निर्यात केंद्र सरकारमार्फत केली जात असे. मात्र, आज झालेल्या निर्णयानुसार सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात आता खुली झाली आहे.
(centre now lifts ban on non basmati white rice exports)
दरम्यान निर्यात होणाऱ्या या तांदळावर किमान निर्यात मूल्यासोबत (MEP) निर्यात शुल्काचीही अट असणार आहे. केंद्र सरकाने आधी असलेले किमान निर्यात मुल्य २०% टक्क्यावरून १० % करम्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती असून त्यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक लवकरच निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, हरियाणामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असले, तरी सध्या भात उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. कांदा निर्यातबंदी उठवल्याचा निर्णयही महाराष्ट्र आणि इतर राज्यातील निवडणुकांना समोर ठेवून घेतला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
देशांतर्गत भाताचे उत्पादन वाढीसाठी केंद्र सरकारने २० जुलै २०२३ मध्ये बिगर बासमती पांढर्या तांदळावर निर्यातबंदी घातली होती. त्याचबरोबर बासमीत तांदळावर २० टक्के निर्यातशुल्कही लागू केले होते. त्यानंतर निर्यात केल्या जाणाऱ्या देशांमध्ये तांदळाचे दर वाढले होते. तर सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा नेपाळ, सेशेल्स, मलेशिया, फिलीपीन्स,कॅमरून, कोटडी आयवरी आणि गिनी या देशांना फायदा होणार आहे.