Lokmat Agro >शेतशिवार > Reshim sheti : कमी खार्चात अधिक उत्पादन देणारी रेशीम शेतीच भारी

Reshim sheti : कमी खार्चात अधिक उत्पादन देणारी रेशीम शेतीच भारी

Reshim sheti: Silk farming is a great way to produce more at less cost | Reshim sheti : कमी खार्चात अधिक उत्पादन देणारी रेशीम शेतीच भारी

Reshim sheti : कमी खार्चात अधिक उत्पादन देणारी रेशीम शेतीच भारी

Reshim sheti : वारंवार बदलत चाललेले हवामान, त्याचा पिकांना बसणारा फटका, मेहनतीने चांगले उत्पादन काढूनही बाजारात मिळत नसलेला भाव अशा काही कारणांनी शेतकरी मेटाकुटीला आला असून, तो आता शाश्वत उत्पादनासाठी रेशीम शेतीकडे वळू लागला आहे. (Reshim sheti)

Reshim sheti : वारंवार बदलत चाललेले हवामान, त्याचा पिकांना बसणारा फटका, मेहनतीने चांगले उत्पादन काढूनही बाजारात मिळत नसलेला भाव अशा काही कारणांनी शेतकरी मेटाकुटीला आला असून, तो आता शाश्वत उत्पादनासाठी रेशीम शेतीकडे वळू लागला आहे. (Reshim sheti)

शेअर :

Join us
Join usNext

वारंवार बदलत चाललेले हवामान, त्याचा पिकांना बसणारा फटका, मेहनतीने चांगले उत्पादन काढूनही बाजारात मिळत नसलेला भाव अशा काही कारणांनी शेतकरी मेटाकुटीला आला असून, तो आता शाश्वत उत्पादनासाठी रेशीम शेतीकडे वळू लागला आहे. (Reshim sheti)

हिंगोली जिल्ह्यात रेशीम शेतीचे क्षेत्र ६९० एकरापर्यंत पोहोचले आहे. सध्या ४३० एकरामध्ये ४७.५४० मेट्रीक टन कोषाचे उत्पादन घेण्यात आले आहे.
 
जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने तीच-तीच पिके घेत असल्याने जमिनीचा पोत ढासळत आहे. रासायनिक खते, कीटकनाशकाच्या अतिवापराचा फटका पिकांना बसत आहे. (Reshim sheti)

वाढता उत्पादन खर्च व लहरी हवामानामुळे होणारे नुकसान अशा दुहेरी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील माती हवामान रेशीम शेतीला अनुकूल असल्याने रेशीम शेती फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल रेशीम शेतीकडे वाढत आहे.

एक एकर जमिनीमध्ये वर्षभरात जवळपास दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न शेतकरी घेत आहेत. सध्या ४३० एकर क्षेत्रावर रेशीम शेती केली जात आहे. यातून १ लाख २३ हजार २०० अंडीपुंजच निघाले असून, ४७.५४० मेट्रिक टन उत्पादन निघाले आहे.

सव्वाचार लाखांचे अनुदान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रेशीम शेतीसाठी तीन वर्षात टप्प्याटप्प्याने ४ लाख १८ हजार ८१५ रुपये अनुदान दिले जाते. यामध्ये तुती लागवडीसाठी २ लाख ३४ हजार ५५४ रुपये, कीटक संगोपन गृह बांधकामासाठी १ लाख ८४ हजार २६१ रुपये अनुदानाचा समावेश आहे. बहुभूधारक शेतकऱ्यांना रेशीम लागवडीसाठी सिल्क समग्र २ योजनेतून ३ लाख ३१ हजार २५० रुपये ते ४ लाख ४५ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते.

एक किलो कोषाला मिळतो ४५० रुपये दर

रेशीम शेतीतून एका एकरात अडीच लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. एका एकरमधील तुतीचा पाला रेशीम कीटकाच्या २०० अंडीपुंजासाठी वापरला जातो.

यापासून सरासरी १३० ते १४० किलोग्रॅम रेशीम कोषांचे उत्पादन मिळू शकते. एक किलो कोषाला सरासरी ४५० रुपये दर मिळत आहे.

एका पिकात ५८ ते ६३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. तर वर्षभरात चार पिके घेतल्यास जवळपास अडीच लाख रुपये उत्पन्न एक एकरात मिळू शकते.

२८० शेतकऱ्यांची नोंदणी

जिल्ह्यात ९ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान महारेशीम अभियान राबविण्यात आले. या कालावधीत पथकाने १५५० शेतकऱ्यांची भेट घेत रेशीम शेतीची माहिती दिली. यावेळी २८० शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियान कालावधीत नावनोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम लागवडीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Wheat Market : पुसद बाजारात गव्हाची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Web Title: Reshim sheti: Silk farming is a great way to produce more at less cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.