Lokmat Agro >शेतशिवार > Reshima farming : "तुती" लागवडीची आधुनिक पध्दत 

Reshima farming : "तुती" लागवडीची आधुनिक पध्दत 

Reshima farming : Modern method of "mulberry" cultivation  | Reshima farming : "तुती" लागवडीची आधुनिक पध्दत 

Reshima farming : "तुती" लागवडीची आधुनिक पध्दत 

Reshima farming : तुती रेशीम विकास कार्यक्रमांतर्गत आता राज्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.

Reshima farming : तुती रेशीम विकास कार्यक्रमांतर्गत आता राज्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Reshima farming : 

संतोष वानखडे :

तुती रेशीम विकास कार्यक्रमांतर्गत वाशिमसह राज्यातील २४ जिल्ह्यांत तुती लागवड कार्यक्रम राबविला जात आहे. राज्यात २०२१-२२ मध्ये तुती लागवडीखाली असलेले १४ हजार ९०५ हेक्टर क्षेत्र २०२३-२४ मध्ये १८ हजार ६०७ हेक्टरवर पोहोचले आहे. जवळपास ३७०२ हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे आता राज्यात रेशीम क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ होताना दिसते. शेतकऱ्यांना आता रेशीम शेतीचे महत्व लक्षात आले आहे.  
आधुनिक पध्दतीमध्ये शेती करण्यावर आता भर दिला जात आहे. सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी नानाविध प्रयोग करीत अधिकाधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. 
पारंपरिक पिकांसोबतच तुती लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याची क्षमता असलेला रेशीम उत्पादन हा कृषी आधारित उद्योग आहे. 
तुती रेशीम विकास कार्यक्रमांतर्गत वाशिमसह राज्यातील २४ जिल्ह्यांत तुती लागवडीवर भर दिला जात आहे. जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तुती लागवड केली जाते. पूर्वी तुतीच्या फांदीपासून कलम तयार करून लागवड केली जायची; परंतु त्यामध्ये २० ते २५ टक्के तूट / खाडे पडायची. 
त्यामुळे एकरी ५ हजार ५०० झाडांची संख्या राखली जात नव्हती. पर्यायाने प्रतिएकर २०० अंडीपुंजाचे संगोपन होत नव्हते. आता तुतीच्या ३ महिने पूर्ण वाढ झालेल्या रोपापासून लागवड केली जाते. 'मनरेगा'अंतर्गत तुती लागवडीसाठी रोपे व मजुरीचा खर्चदेखील दिला जातो.  
तीन वर्षांतील राज्यातील तुती लागवडीवर नजर टाकली तर जवळपास ३ हजार ७०२ हेक्टरने क्षेत्र वाढल्याचे दिसून येते.

रेशीम शेतीचे महत्त्व पटवून दिले जात असल्याने शेतकरीदेखील रेशीम शेतीकडे आता वळताना दिसतोय. राज्यात सन २०२१-२२ मध्ये तुती लागवडीखाली असलेले १४ हजार ९०५ हेक्टर क्षेत्र सन २०२३-२४ मध्ये १८ हजार ६०७ हेक्टरवर पोहोचले. जवळपास ३७०२ हेक्टरने क्षेत्र वाढले.

वाशिम जिल्ह्यातील १८२ शेतकऱ्यांची नोंदणी

चालू वर्षात रेशीम उद्योग करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील १८२ शेतकऱ्यांनी २०३ एकर तुती लागवड करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाकडे नोंदणी केली. मनरेगाअंतर्गत ५६ एकर, तर उर्वरित १४७ क्षेत्रांवर सिल्क समग्र -२ या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत तुती लागवड झाली.

वर्षतुती लागवडी खालील क्षेत्र लागवड करणारे शेतकरी
२०२१-२२ १४,९०५१४,२९६
२०२२-२३१३,८७२ १३,३६७
२०२३-२४ १८,६०७  १७,५२१

Web Title: Reshima farming : Modern method of "mulberry" cultivation 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.