Join us

कृषी विभाग रब्बी हंगाम सन २०२३ राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर; पहा विजेत्या शेतकऱ्यांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 20:25 IST

Rabi 2023 Pik Spardha Nikal राज्यात रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या ०५ पिकांसाठी पिकस्पर्धा आयोजन करण्यात आले होते. पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पिक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

राज्यात रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या ०५ पिकांसाठी पिकस्पर्धा आयोजन करण्यात आले होते. पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो.

शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षीसे देण्यात येतात. रब्बी हंगाम सन २०२३ पिकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल मा. आयुक्त (कृषी) यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पिकस्पर्धा निकाल समितीद्वारे जाहीर करण्यात आले.

ज्या शेतकऱ्याची स्‍पर्धेत भाग घेतलेल्या पीकाची उत्पादकता तालुक्याच्या त्‍या पीकाच्‍या सरासरी उत्पादकतेच्या (त्‍या पीकाची मागील ५ वर्षाची सरासरी उत्‍पादकता) दिडपट किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येते.

राज्यस्तरावरील निकाल घोषित झाल्यानंतर राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते वगळून जिल्हास्तरीय पिकस्पर्धा निकाल समितीने संबंधित जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील स्पर्धकांमधून जिल्हास्तरावरील पिकनिहाय सर्वसाधारण व आदिवासी गटाकरिता प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेत्यांची निवड करुन निकाल घोषित केले जातील.

तद्नंतर राज्य आणि जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते वगळून तालुकास्तरीय पिकस्पर्धा निकाल समितीने संबंधित तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील स्पर्धकांमधून पिकनिहाय सर्वसाधारण व आदिवासी गटाकरिता तालुकास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेत्यांची निवड करुन निकाल घोषित केले जातील.

पिकस्पर्धा रब्‍बी हंगाम २०२३ राज्यस्तरीय विजेते शेतकरी तपशील खालीलप्रमाणे

ज्‍वारी (सर्वसाधारण गट)कोल्‍हापूर - श्री. चंद्रसेन नारायण पाटील - तिसंगी, कवठे महांकाळकोल्‍हापूर - श्री. विशाल वसंत पवार - कवठे महांकाळलातूर - श्री. रत्नाकर गंगाधर ढगे - सायाळ, लोहा, नांदेड

ज्‍वारी (आदिवासी गट)नाशिक- श्री. लक्ष्मण सजन पाडवी - बंधारा, तळेादा, नंदुरबारनाशिक- श्री. शिवाजी मिचरा गावित - कुकरान, नवापूर, नंदुरबारनाशिक- श्री. विक्रम बळवंत मावची - खेकडा, नवापूर, नंदुरबार

गहू (सर्वसाधारण गट)नाशिक- श्री. गोरखनाथ पोपटराव राजोळे - एकलहरे, नाशिकनाशिक- श्रीमती लिलाबाई मधुकर पेखळे - माडसांगवी, नाशिकनाशिक- श्री. रामदास विठोबा करंजकर - भगूर, नाशिक

गहू (आदिवासी गट)नाशिक - श्री. त्र्यंबक सुका बेंडकोळी - धोंडेगाव, नाशिकपुणे - श्रीमती यमुनाबाई विठ्ठल मोहरे - अवसरी बु, आंबेगाव, पुणेअमरावती - श्री. कालु नंदा भुसुम - कारदा, चिखलदरा, अमरावती

हरभरा (सर्वसाधारण गट)कोल्‍हापूर - श्री. नवनाथ दतू खोत - लोणारवाडी, कवठे महांकाळ, सांगलीनाशिक - श्री. ज्ञानेश्‍वर जोगीलाल पाटील - कुसुंबा, चोपडा, जळगावअमरावती - श्री. प्रशांत जानराव क्षिरसागर - खारतळेगाव, भातकुली, अमरावती

हरभरा (आदिवासी गट)नागपूर - श्री. अरुण कवडुजी केदार - शेगाव खुर्द, भद्रावती, चंद्रपूरनागपूर - श्री. सुदरशहा सोनु जुमनाके - चक खापरी, पोंभुर्णा, चंद्रपूरनाशिक - श्री. रणजित श्रीराम पावरा - खैरखुटी, शिरपूर, धुळे

करडई (सर्वसाधारण गट)लातूर - श्री. माधव शंकरराव पाटील - चैनपूर, देगलूर, नांदेडलातूर - श्री. सुनील नामदेव चीमनपाडे - कुडली, देगलूर, नांदेडलातूर - श्री. विश्‍वनाथ भाऊराव माडजे - येरोळ, शिरुर अनंतपाळ, लातूर

जवस (सर्वसाधारण गट)नागपूर - श्री. लीलीराम उध्‍दव पिदुरकर - चक खापरी, पोंभुर्णा, चंद्रपूरनागपूर - श्री. तुळशीराम भिवाजी मोरे - चक खापरी, पोंभुर्णा, चंद्रपूरनागपूर - श्री. यशवंत विश्‍वनाथ काळे - चक खापरी, पोंभुर्णा, चंद्रपूर

जवस (आदिवासी गट)नागपूर - श्री. हरीश्‍चंद्र आनंदराव कोडापे - चक खापरी, पोंभुर्णा, चंद्रपूरनागपूर - श्री. तुळशीराम गोसाई जुमनाके - चक खापरी, पोंभुर्णा, चंद्रपूरनागपूर- श्रीमती कुसुमबाई आनंदराव कोडापे - चक खापरी, पोंभुर्णा, चंद्रपूर

टॅग्स :शेतकरीशेतीराज्य सरकारसरकारज्वारीकरडईगहूहरभरारब्बी