Lokmat Agro >शेतशिवार > Rice Cultivation Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात ६८ हजार हेक्टरवर होणार भात लागवड

Rice Cultivation Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात ६८ हजार हेक्टरवर होणार भात लागवड

Rice cultivation will be done on 68 thousand hectares in Ratnagiri district | Rice Cultivation Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात ६८ हजार हेक्टरवर होणार भात लागवड

Rice Cultivation Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात ६८ हजार हेक्टरवर होणार भात लागवड

Rice Cultivation Ratnagiri: पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, पेरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या तरी दिवसा उघडीप व रात्री पाऊस अशी स्थिती आहे. हा पाऊस पेरणीसाठी योग्य असल्याने शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत.

Rice Cultivation Ratnagiri: पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, पेरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या तरी दिवसा उघडीप व रात्री पाऊस अशी स्थिती आहे. हा पाऊस पेरणीसाठी योग्य असल्याने शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

रोहिणी नक्षत्रापासून खरीप हंगामाला सुरुवात होते. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील काही भागांमध्ये हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना हळूहळू सुरुवात केली. जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाने हजेरी लावली आहे.

पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, पेरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या तरी दिवसा उघडीप व रात्री पाऊस अशी स्थिती आहे. हा पाऊस पेरणीसाठी योग्य असल्याने शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत.

दोन दिवसाच्या पावसामुळे विहिरींच्या पाण्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईसुद्धा काही प्रमाणात दूर झाली आहे जिल्ह्यात जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीसाठी भात बियाण्यांची निवड केली जाते. गरवे, निमगरवे, हळवे भाताच्या वाणाची लागवड केली जाते.

प्रयोगशील शेतकरी अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित वाणाचा वापर करत आहेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्र कमी झाले असले तरी उत्पादकता मात्र वाढली आहे.

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडल्याने भाताच्या पेरण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. रोपे उगवून आल्यानंतर २० ते २२ दिवसाच्या फरकानंतर रोपे काढून लागवड केली जाते. त्यामुळे सध्याचे वातावरण रोपे उगवून येण्यासाठी अनुकूल आहे.

गतवर्षी 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे पाऊस लांबल्याने पेरण्यांना ही विलंब झाला होता. मात्र, यावर्षी पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांचे वेळापत्रक ही कोलमडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात तर १० हजार हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लागवड केली जाते.

याशिवाय भाजीपाला व अन्य पिकांची लागवड करण्यात येते. कृषी विभागातर्फे जिल्ह्यासाठी सहा हजार क्विंटल भात बियाणांची उपलब्धता केली आहे. तर खरिपासाठी १४ हजार मेट्रिक टन खताची मागणी केली आहे. खताची उपलब्धता टप्प्याटप्प्याने होत असली तरी शेतकऱ्यांनी भात बियाण्यांसह खतांची खरेदी सुरू केली आहे.

जिल्ह्यातील लागवडीखालील एकूण क्षेत्र (हेक्टरमध्ये) ८०,३९०
भात ६८,५५०
नागली १०,७३५
तृणधान्य ४४०
कडधान्य ६५

जिल्ह्यासाठी १४ हजार मेट्रिक टन खत मंजूर झाले असून, खताची उपलब्धता सुरू झाली आहे. युरिया, डीएपी, एमओपी खत उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्याचे लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यावर कृषी विभागाचा भर आहे. ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांची खताअभावी गैरसोय होऊ नये यासाठी २९० मेट्रिक टन खताचा 'बफर स्टॉक ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे

घालण्यात येतात. मात्र काही शेतकरी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा सर्वाधिक वापर करत आहेत. कीटकनाशकांचा प्रादुभर्भाव रोखण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली जाते. शेतीच्या कामात खताचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागातर्फे खताची उपलब्धता करण्यात येत आहे.

यांच्या विक्रीतून शेतकयांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने भरारी पथके नियुक्त केली आहेत. त्याद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच जिल्हास्तरावर तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. खत विक्रेत्यांनाही पॉस मशीनद्वारेच खत विक्री करण्याची सूचना केली आहे. भरारी पथकाद्वारे खताची गुणवत्ता, योग्य वितरण, चांगला दर्जा याबाबतही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

यावर्षी लागवड क्षेत्र वाढविण्याचा निर्धार
■ हवामानातील बदलाचा परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर होत आहे. जिल्ह्यातील भातशेती पावसावर अवलंबून आहे.
■ मुख्य पीक भात असले तरी दुय्यम पीक म्हणून नाचणीची लागवड केली जाते. कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य, भाजीपाला लागवड करण्यात येते.
■ कोरोनाकाळात मुंबईकर गावी आल्याने भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली होती.
■ मात्र, पुन्हा दोन वर्ष लागवड क्षेत्रात घट झाली आहे. मात्र, यावर्षी क्षेत्र वाढीचा निर्धार कृषी विभागाने केला आहे.

- मेहरुन नाकाडे, रत्नागिरी

Web Title: Rice cultivation will be done on 68 thousand hectares in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.