Join us

River Linking Project in Maharashtra : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा नदीजोडसाठी १५,७०० कोटीची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 9:38 AM

गोदावरी नदीजोड योजनेस तसेच दमण गंगा वैतरणा गोदावरी नदीजोड योजनेस सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुंबई : गोदावरीनदीजोड योजनेस तसेच दमण गंगा वैतरणा गोदावरीनदीजोड योजनेस सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

दमण गंगा एकदरे-गोदावरीतून मराठवाड्यात १० हजार ११ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होईल, तसेच ६८ दलघमी पाणी सिंचनासाठी, १३.७६ दलघमी पाणी पिण्यासाठी आणि ९.१७ दलघमी पाणी उद्योगासाठी उपलब्ध होणार आहे.

यापूर्वी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळविण्याच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे.

आंतरराज्यीय दमण गंगा-पिंजाळ, नदीजोड प्रकल्प व नारपार गिरणा नदी योजना, पार-गोदावरी, दमण गंगा वैतरणा-गोदावरी, दमण गंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांना राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पांची किंमत २ हजार २१३ कोटी रुपये आहे. दमण गंगा वैतरणा गोदावरी नदीजोड योजनेच्या १३ हजार ४९७ कोटी किमतीच्या प्रकल्पासदेखील मान्यता देण्यात आली.

हा प्रकल्प दमण गंगा आणि वैतरणा उपखोऱ्यातील ५.६८ टीएमसी अतिरिक्त पाणी स्थानिक वापरासाठी तसेच नाशिक जिल्ह्यातील अवर्षणप्रवण सिन्नर तालुका आणि जायकवाडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्राला याचा लाभ होईन.

टॅग्स :पाटबंधारे प्रकल्पमराठवाडानदीमहाराष्ट्रसरकारकोकणराज्य सरकारएकनाथ शिंदेजायकवाडी धरणसिन्नरगोदावरी