Lokmat Agro >शेतशिवार > Rojgar Hami Yojana : ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्राने ५ वर्षात केली सर्वाधिक वाढ

Rojgar Hami Yojana : ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्राने ५ वर्षात केली सर्वाधिक वाढ

Rojgar Hami Yojana: Maharashtra has achieved the highest growth in 5 years under the Rural Employment Guarantee Scheme | Rojgar Hami Yojana : ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्राने ५ वर्षात केली सर्वाधिक वाढ

Rojgar Hami Yojana : ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्राने ५ वर्षात केली सर्वाधिक वाढ

mgnrega maharashtra महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) महाराष्ट्राने ५ वर्षात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे.

mgnrega maharashtra महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) महाराष्ट्राने ५ वर्षात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हरीश गुप्ता
नवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) महाराष्ट्राने ५ वर्षात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे.

या योजनेअंतर्गत मनुष्य दिवस २.५५ पट वाढले असून ६२९.५८ लाख दिवसांवरून ते १,६११.२० लाख मनुष्य दिवस झाले आहे. 

रोजगार हमीतील या वाढीमुळे ग्रामीण रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्र सर्वात वेगाने वाढणारे राज्य म्हणून पुढे आले आहे. ही वाढ राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.

याच कालावधीत राष्ट्रीय वाढ जवळपास ८ टक्के होती म्हणजेच २६,५२०.५४ लाख मनुष्य दिवसांवरून २८,७१५.०१ लाख मनुष्य दिवस झाली आहे.

असे आहे निधी वाटप (वर्ष २०२४-२५) सर्व आकडे कोटी रुपयांत
महाराष्ट्र ३,१९०.५८
उत्तर प्रदेश ६,५८५.३९
गुजरात १,१०४.२३
पंजाब ९४७.०९
हरयाणा ३९८.८०
(२०१९-२० मध्ये महाराष्ट्राला १,०९८.०१ कोटी मिळाले होते.)

मनरेगाअंतर्गतचे मनुष्य दिवस (सर्व आकडे लाख मनुष्य दिवसांमध्ये)

राज्य२०१९-२०२०२४-२५वाढ टक्क्यांत
महाराष्ट्र६२९.५८१,६११.२०२५५.९२
उत्तर प्रदेश२,४४३.२८३,३३७.९११३६.६२
गुजरात३५३.६९४२८.१२१२१.०४
पंजाब२३५.२५३०९.११३१.३९
हरयाणा९१.१९११५.८७१२७.०६
पूर्ण देश२५,०५६.३४३०,०६८.४२१२०.००

बहुतांश ग्रामीण कुटुंबे मनरेगावर अवलंबून
मर्यादित पर्यायी संधींमुळे राज्यातील बहुतांश ग्रामीण कुटुंबे मनरेगावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. २०२४-२५ मध्ये ३,३३७.९१ लाख मानवी दिवसांसह उत्तर प्रदेश आघाडीवर होता. या राज्यात २०१९-२० पासून ३६ टक्के वाढ नोंदविली गेली. कोरोनाकाळात मनरेगा उपक्रमात वाढ झाली होती परंतु त्यानंतर ती स्थिर राहिली आहे.

मनुष्य दिवस काम म्हणजे काय?
मनरेगामध्ये 'मनुष्य दिवस' म्हणजे एका व्यक्तीने एका दिवसासाठी केलेल्या कामाची नोंद असते. या हमीनुसार काम करणाऱ्या व्यक्तीने केलेले काम 'मनुष्य दिवस' म्हणून मोजले जाते. एका व्यक्तीने एका दिवसासाठी केलेल्या कामाला एक 'मनुष्य दिवस' मानले जाते.

अधिक वाचा: ओतूरचे शेतकरी शरदराव यांचा केळी शेतीत नवा प्रयोग; घेतले शुगर फ्री लाल केळीचे उत्पादन

Web Title: Rojgar Hami Yojana: Maharashtra has achieved the highest growth in 5 years under the Rural Employment Guarantee Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.