हरीश गुप्तानवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) महाराष्ट्राने ५ वर्षात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे.
या योजनेअंतर्गत मनुष्य दिवस २.५५ पट वाढले असून ६२९.५८ लाख दिवसांवरून ते १,६११.२० लाख मनुष्य दिवस झाले आहे.
रोजगार हमीतील या वाढीमुळे ग्रामीण रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्र सर्वात वेगाने वाढणारे राज्य म्हणून पुढे आले आहे. ही वाढ राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.
याच कालावधीत राष्ट्रीय वाढ जवळपास ८ टक्के होती म्हणजेच २६,५२०.५४ लाख मनुष्य दिवसांवरून २८,७१५.०१ लाख मनुष्य दिवस झाली आहे.
असे आहे निधी वाटप (वर्ष २०२४-२५) सर्व आकडे कोटी रुपयांतमहाराष्ट्र ३,१९०.५८उत्तर प्रदेश ६,५८५.३९गुजरात १,१०४.२३पंजाब ९४७.०९हरयाणा ३९८.८०(२०१९-२० मध्ये महाराष्ट्राला १,०९८.०१ कोटी मिळाले होते.)
मनरेगाअंतर्गतचे मनुष्य दिवस (सर्व आकडे लाख मनुष्य दिवसांमध्ये)
राज्य | २०१९-२० | २०२४-२५ | वाढ टक्क्यांत |
महाराष्ट्र | ६२९.५८ | १,६११.२० | २५५.९२ |
उत्तर प्रदेश | २,४४३.२८ | ३,३३७.९१ | १३६.६२ |
गुजरात | ३५३.६९ | ४२८.१२ | १२१.०४ |
पंजाब | २३५.२५ | ३०९.१ | १३१.३९ |
हरयाणा | ९१.१९ | ११५.८७ | १२७.०६ |
पूर्ण देश | २५,०५६.३४ | ३०,०६८.४२ | १२०.०० |
बहुतांश ग्रामीण कुटुंबे मनरेगावर अवलंबूनमर्यादित पर्यायी संधींमुळे राज्यातील बहुतांश ग्रामीण कुटुंबे मनरेगावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. २०२४-२५ मध्ये ३,३३७.९१ लाख मानवी दिवसांसह उत्तर प्रदेश आघाडीवर होता. या राज्यात २०१९-२० पासून ३६ टक्के वाढ नोंदविली गेली. कोरोनाकाळात मनरेगा उपक्रमात वाढ झाली होती परंतु त्यानंतर ती स्थिर राहिली आहे.
मनुष्य दिवस काम म्हणजे काय?मनरेगामध्ये 'मनुष्य दिवस' म्हणजे एका व्यक्तीने एका दिवसासाठी केलेल्या कामाची नोंद असते. या हमीनुसार काम करणाऱ्या व्यक्तीने केलेले काम 'मनुष्य दिवस' म्हणून मोजले जाते. एका व्यक्तीने एका दिवसासाठी केलेल्या कामाला एक 'मनुष्य दिवस' मानले जाते.
अधिक वाचा: ओतूरचे शेतकरी शरदराव यांचा केळी शेतीत नवा प्रयोग; घेतले शुगर फ्री लाल केळीचे उत्पादन