Join us

पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून 10 हजार रुपयांची मदत जाहीर

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 24, 2023 7:24 PM

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपये तातडीने देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपये तातडीने देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच पुरात मृत्यू पावलेल्याच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये मदत राज्य सरकार देणार आहे.

शेती पिकांचे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करून बाधित भागातील व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वाटप तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून  करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. 

विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा व इतर जिल्ह्यांना पुराने वेढा घातल्याचे चित्र होते. नदी नाल्यांना पूर आल्याने तसेच शेतात पाणी साठल्याने  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाकरिता 513 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. इ केवायसी केल्यानंतर सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याची घोषणाही त्यांनी पावसाळी अधिवेशनात केली.  

अतिवृष्टीत दुकानांच्या झालेल्या नुकसानासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून अधिकृत दुकानांसाठी नुकसानाच्या प्रमाणात 50 हजार रुपयांचा मर्यादित व टपरीचे नुकसान झाल्यास नुकसानाच्या प्रमाणात दहा हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :अजित पवारशेतकरीपूरपीकसरकारएकनाथ शिंदेपीक व्यवस्थापन